आरोग्यास घातक तरी बर्फगोळ्याची विक्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2024 18:34 IST2024-05-15T18:33:10+5:302024-05-15T18:34:00+5:30
Yavatmal : अन्न व औषधी प्रशासनाने आइसगोळा शरीरासाठी घटक असल्याचे दिले निर्देश

Sale of ice cubes is harmful to health
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : शहरात ठिकठिकाणी थंड पेयाची दुकाने थाटण्यात आली असून मे महिन्यातील रखरखत्या उष्णतेपासून शरीराला थंडावा मिळावा, म्हणून मोठ्या प्रमाणात ग्राहक थंड पेयांचा आस्वाद घेताना दिसत आहेत. चारचाकी गाड्यांवर आरोग्यास घातक आइसगोळा विक्रेते मोठ्या प्रमाणात गल्लोगल्ली फिरून विक्री करीत आहेत. युवक-युवतींसह लहान बालके रंगीबेरंगी आइसगोळ्याकडे आकर्षित होत आहेत.
अन्न व औषधी प्रशासनाचे थंडपेय विक्रेत्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने, काही धंदेवाईक थंडपेय विक्रेत्यांनी लस्सी, आइस्क्रीम व अन्य थंडपेयांना स्वाद येण्यासाठी घातक रसायनांचा मोठ्या प्रमाणात वापर सुरू केल्याने जनआरोग्यास धोका उद्भवण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
ग्रामीण व शहरी भागात आइसगोळा विक्रेते दाखल झाले आहेत. आकर्षक रंगीबेरंगी आइसगोळा आरोग्यास घातक असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. उन्हापासून सुरक्षितता मिळावी, यासाठी प्रत्येक जण वेगवेगळ्या तन्हेने उपाययोजना करीत आहेत. अन्न व औषधी प्रशासनाने थंड पेयातील घातक रसायनांचा शोध घेऊन योग्य कार्यवाही करण्याची गरज निर्माण झाली आहे. शहरात राजरोस व बिनबोभाटपणे सुरू असलेले हे प्रकार थांबवावे, अशी मागणी आहे.