पांढरकवडा तालुक्यात भेसळयुक्त मिष्ठान्नाची विक्री

By Admin | Published: January 6, 2016 03:26 AM2016-01-06T03:26:18+5:302016-01-06T03:26:18+5:30

तालुक्यात भेसळयुक्त मिष्ठान्नाची मोठ्या प्रमाणात विक्री केली जात आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे. ...

Sales of adulterated sugar candy in Pandharwada taluka | पांढरकवडा तालुक्यात भेसळयुक्त मिष्ठान्नाची विक्री

पांढरकवडा तालुक्यात भेसळयुक्त मिष्ठान्नाची विक्री

googlenewsNext

पांढरकवडा : तालुक्यात भेसळयुक्त मिष्ठान्नाची मोठ्या प्रमाणात विक्री केली जात आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे.
गेल्या आठ ते १० वर्षांपासून व्यावसायिकांनी पांढरकवडा शहरासह अनेक गावांमध्ये स्वीट मार्ट या नावाखाली मिष्ठान्न विक्रीची अनेक दुकाने थाटली आहे. सुरूवातीला मिष्ठान्न तयार करताना त्यामध्ये दर्जेदार पदार्थ वापरले जात होते. कोणत्याही प्रकारचे भेसळ त्यामध्ये केले जात नव्हते. छोट्या-छोट्या दुकानांमध्ये चालत असलेला हा व्यवसाय कालांतराने मोठ्या दुकानांमध्ये स्थानांतरीत झाला. लाखो रूपयांची पगडी देऊन भाडे तत्त्वावर व्यावसायीकांनी ही दुकाने थाटली.
गेल्या काही वर्षात त्यांनी या व्यवसायात चांगलाच जम बसविला. तालुक्यात गोधन नामशेष होण्याच्या मार्गावर असताना व नागरिकांना दुधाची मोठ्या प्रमाणात कमतरता भासत असताना मिष्ठान्न बनविण्यासाठी नियमितपणे लागणारे शेकडो लीटर दूध कोठून आणले जाते, याची साधी चौकशीही केली जात नाही.
संबंधित प्रतिनिधीने याबाबत चौकशी केली असता, मिष्ठान्नाच्या अनेक प्रकारामध्ये भेसळयुक्त दूध व रसायनांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात असल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. काही बोटावर मोजण्याइतकीच मिठाईची दुकाने सोडल्यास मिष्ठान्न तयार करताना बहुतांश स्वीट मार्टमध्ये हीच पद्धत वापरली जाते. अन्न व औषधी प्रशासनाचे मात्र याकडे सपशेल दुर्लक्ष होत आहे.
मिष्ठान्न कोणकोणत्या पदार्थांपासून तयार करण्यात येते, हे मिष्ठान्न किती दिवसापर्यंत विकायचे, ते खाण्यासाठी योग्य आहे किंवा नाही, याची चौकशी करून खातरजमा करण्याची जबाबदारी अन्न व औषधी प्रशासन विभागाची आहे. मात्र आजपर्यंतच्या इतिहासात कोणत्याही स्वीट मार्टमधील मिष्ठान्नाची साधी चौकशीही करण्यात आली नाही. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Sales of adulterated sugar candy in Pandharwada taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.