यवतमाळात आजपासून समता पर्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 10:41 PM2018-04-09T22:41:39+5:302018-04-09T22:41:39+5:30
महात्मा ज्योतिराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने यवतमाळात समता पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. यात १० ते १४ एप्रिलर्यंत विविध प्रबोधनपर कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. याबाबत समता पर्व प्रतिष्ठाणच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : महात्मा ज्योतिराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने यवतमाळात समता पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. यात १० ते १४ एप्रिलर्यंत विविध प्रबोधनपर कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. याबाबत समता पर्व प्रतिष्ठाणच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
१० एप्रिल रोजी यवतमाळ आयडॉलचे उद्घाटन सारेगामापा उपविजेता उज्ज्वल गजभार यांच्या हस्ते होईल. प्रा. अतुल शिरे, परवेज शहा यांची प्रमुख उपस्थिती राहील. रात्री ८ वाजता समता पर्वाचे उद्घाटन जेएनयूचे डॉ. गोपाल गुरू आहेत. अध्यक्षस्थानी उद्योग विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे राहतील. यावेळी डॉ. गोपाल गुरु यांना महात्मा फुले-डॉ. बाबासाहेब आंबेडकर समतारत्न पुरस्कार देण्यात येणार आहे. १४ आॅक्टोबर १९५६ ला झालेल्या दीक्षा समारंभाचे साक्षीदार वसंतराव गेडाम यांचा सत्कार यावेळी करण्यात येणार आहे. ११ एप्रिलला सकाळी ७ वाजता महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन करण्यात येणार आहे. सायंकाळी ६ वाजता आयडॉलची अंतिम फेरी होईल. रात्री ८ वाजता प्रसिद्ध लेखक सत्नाम सिंघ यांचे ‘फुले आंबेडकरी समाज आंदोलन का स्वरुप और समाज की भागीदारी’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.
१२ एप्रिलला दुपारी २ वाजता उद्योजक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाचा कार्यक्रम ‘मेडिकल’च्या जवाहरलाल दर्डा श्रोतृगृहात होणार आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी आडे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. ४ वाजता भारत लढे यांच्या अध्यक्षतेखाली समता कवी संमेलन होणार आहे. सायंकाळी ६ वाजता डॉ. मुन्नी भारती यांचे ‘आंबेडकरी विचारधारा व आनेवाली पिढी की समस्या’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले समर्पण पुरस्कार देण्यात येणार आहे. डॉ. संघमित्रा गोणारकर, अॅड. स्मिता कांबळे यांचे मार्गदर्शन होणार आहे. समता पर्वात चित्रकला, निबंध, वक्तृत्व, सामान्य ज्ञान, स्मरणशक्ती, अंताक्षरी आदी स्पर्धा घेण्यात येणार आहे. त्यांचे बक्षीस वितरण १३ एप्रिल रोजी होणार आहे. सायंकाळी ६ वाजता अभियंता डी.जी.बोरकर प्रेरणा पुरस्कार राजेंद्र सूर्यवंशी यांना, तर म.बा.मेश्राम पत्रकार पुरस्कार ‘लोकमत’चे विलास गावंडे यांना देण्यात येणार आहे. तसेच पोलीस उपनिरीक्षक संतोष मनवर यांचा सत्कार होईल.
समारोपीय सत्रात पालकमंत्री मदन येरावार, विधान परिषद उपसभापती माणिकराव ठाकरे, महसूल राज्यमंत्री संजय राठोड, खासदार भावना गवळी, आमदार मनोहरराव नाईक, जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी आडे, नगराध्यक्ष कांचन चौधरी, माजीमंत्री शिवाजीराव मोघे, वसंतराव पुरके, अनिल आडे, राजूदास जाधव, मो. तारीक लोखंडवाला उपस्थित राहतील.
पत्रपरिषदेला समता पर्व प्रतिष्ठाणचे अध्यक्ष सिद्धार्थ भवरे, प्रा. अंकुश वाकडे, दीपक नगराळे, सुधीर बनसोड, संदीप कोटंबे, डॉ. बाळकृष्ण सरकटे, चंद्रकांत वाळके, मन्सूर एजाज जोश, डॉ. दिलीप घावडे, नारायण स्थूल आदी उपस्थित होते.
१४ एप्रिलला समता दौड
समता पर्वात १४ एप्रिल रोजी सकाळी ‘सुवर्ण प्रभात’ या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ७ वाजता समता दौड काढण्यात येणार आहे. माध्यमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.