वाहतूक व्यवस्था सुधारा संभाजी ब्रिगेडचा ‘अल्टीमेटम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2019 06:00 AM2019-12-27T06:00:00+5:302019-12-27T06:00:13+5:30

यवतमाळ शहरातील बसस्थानक आर्णी मार्गावर स्थानांतरित केले. तेथे रस्त्याच्या मधोमधच बसस्थानकाच्या प्रवेशद्वाराच्या दोनही बाजूला इतर वाहनांची रांग लागलेली असते. यामुळे याठिकाणी वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला आहे. बसस्थानक चौकातही विकास कामांमुळे बंद केलेले सिग्नल अद्यापही सुरू नाहीत. त्यातच बसस्थानक चौकात वाहतूक वळविण्यात आली आहे.

Sambhaji Brigade 'ultimatum' to improve transport system | वाहतूक व्यवस्था सुधारा संभाजी ब्रिगेडचा ‘अल्टीमेटम’

वाहतूक व्यवस्था सुधारा संभाजी ब्रिगेडचा ‘अल्टीमेटम’

Next
ठळक मुद्देशहरातील गोंधळ : रस्त्यांची कामे व बसस्थानक बदलल्याचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : यवतमाळ शहरातील अंतर्गत वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. कोणते वाहन कुठल्या रस्त्याने जाणार हे निश्चित नाही. यातच रस्त्यांवर विविध प्रकारचे अतिक्रमण वाढले आहे. अनेक सार्वजनिक कार्यालय व खासगी प्रतिष्ठानांना पार्किंगची व्यवस्थाच नाही. त्यामुळे रस्त्यावरच वाहने ठेवावी लागत आहे. याचा फटका सामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. वाहतुकीची व्यवस्था तत्काळ सुधारावी यासाठी संभाजी ब्रिगेडने इशारा दिला आहे.
यवतमाळ शहरातील बसस्थानक आर्णी मार्गावर स्थानांतरित केले. तेथे रस्त्याच्या मधोमधच बसस्थानकाच्या प्रवेशद्वाराच्या दोनही बाजूला इतर वाहनांची रांग लागलेली असते. यामुळे याठिकाणी वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला आहे. बसस्थानक चौकातही विकास कामांमुळे बंद केलेले सिग्नल अद्यापही सुरू नाहीत. त्यातच बसस्थानक चौकात वाहतूक वळविण्यात आली आहे. अशा स्थितीत जड वाहने गावात आल्यानंतर मोठी अडचण निर्माण होते. खासगी प्रवासी वाहने, ट्रॅव्हल्स रस्त्यावरच उभ्या केल्या जातात. जिल्हा परिषदेसमोर, दारव्हा मार्गावर, नाट्यगृह परिसरासमोर, अभ्यंकर कन्या शाळेसमोर या वाहनांचा ठिय्या असतो. मुख्य बाजारपेठेतही अनेक दुकानांना व व्यापारी संकुलांना नियम असतानाही पार्किंगची व्यवस्था केलेली नाही. काहींनी तर जाणीवपूर्वक दुकाने रस्त्यावर मांडली आहे. याचा फटका सामान्य नागरिकांना बसतो. बाजारात खरेदीसाठी निघाल्यानंतर वाहन रस्त्यावर उभे ठेवावे लागते. नो पार्किंग जागेत वाहन ठेवले म्हणून पोलीस त्याला टो करून नेतात. याचा आर्थिक भूर्दंड नागरिकांना सहन करावा लागतो. बँकांसह अनेक सार्वजनिक कार्यालयांसमोरही पार्किंगची व्यवस्थाच नाही. याकडे प्रशासनाचे पूर्णत: दुर्लक्ष आहे. वरिष्ठ पातळीवर याबाबत धोरणात्मक निर्णय घेऊन वाहतूक व्यवस्था व पार्किंगची सुविधा उपलब्ध करून द्यावी, यासाठी संभाजी ब्रिगेडने पुढाकार घेतला आहे. जिल्हाध्यक्ष सुरज खोब्रागडे, सचिन मनोहर, स्वप्नील खोब्रागडे, भरत सकट, रिंकू शंभरकर, अनिकेत मेश्राम, किशोर ठाकरे, प्रशांत ठाकरे, किशोर चव्हाण, विक्की सुरोशे, स्वप्नील मानवतकर यांनी जिल्हा वाहतूक शाखेचे जमादार यशपाल ठाकूर यांना निवेदन दिले आहे.
 

Web Title: Sambhaji Brigade 'ultimatum' to improve transport system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.