शेतकऱ्यांसाठी संभाजी ब्रिगेडचा घंटानाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2019 09:44 PM2019-06-06T21:44:41+5:302019-06-06T21:45:05+5:30
शेतकऱ्यांच्या हक्कासाठी संभाजी ब्रिगेडने गुरूवारी घंटानाद आंदोलन करून यवतमाळकरांचे लक्ष वेधले. विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासना देण्यात आले. सरकारच्या धोरणामुळे शेतकरी होरपळून निघाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शेतकऱ्यांच्या हक्कासाठी संभाजी ब्रिगेडने गुरूवारी घंटानाद आंदोलन करून यवतमाळकरांचे लक्ष वेधले. विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासना देण्यात आले.
सरकारच्या धोरणामुळे शेतकरी होरपळून निघाला आहे. दुष्काळी स्थितीवर उपाययोजना झाल्या नाही. तत्काळ १० हजार रुपयांची एकरी मदत जाहीर करण्यात यावी. एकरी ५० हजारांचे पीककर्ज मंजूर करण्यात यावे. गाय पाळण्यासाठी शासनाकडून गोपालन भत्ता देण्यात यावा. शेतमालास संरक्षण देण्यात यावे. शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारीत आणि वेतन आयोगाच्या धर्तीवर भाव देण्यात यावा. यासह विविध मागण्या करण्यात आल्या.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सूरज खोब्रागडे, सचिन मनवर, प्रवीण भोयर, प्रद्युम्न जवळेकर, विपीन कवाडे, अनिकेत मेश्राम, विजय कदम, शुभम पातोडे, विक्की मेंढे, गौरव बहेकर, अंकीत कुटे, स्वप्नील खोब्रागडे, कुंदन निखाडे, अमोल पावडे उपस्थित होते.
सरकारच्या केवळ व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारेच गप्पा
राज्य शासनाने दुष्काळी उपाययोजना करण्यासंदर्भात कुठलाही विषय गांभीर्याने घेतला नाही. दुष्काळी उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याऐवजी व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे धन्यता मानल्याचा आरोप संघटनेने केला आहे. सरकारच्या या भूमिकेमुळे दुष्काळी तालुक्याची होरपळ वाढली आहे. पाण्यासाठी दहादिशा भटकण्याची वेळ गावातील नागरिकांवर आली आहे. चारा छावण्यांचा पत्ता नसल्याने पशुपालकांसमोर चाºयाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यानंतरही जिल्ह्यात चारा छावणी सुरू झाली नाही.