चंद्रपुरातून वणीत वाळूची तस्करी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 10:17 PM2018-12-11T22:17:44+5:302018-12-11T22:18:50+5:30

वणी तहसील कार्यालयाच्या रॅपेड अ‍ॅक्शन टिमने तालुक्यातील अनेक रेती तस्करांच्या मुसक्या आवळल्यानंतर आता परजिल्ह्यातील वाळू तस्करांनी डोकेवर काढले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर वणी शहरात अवैधरित्या रेती आणली जात असल्याची बाब महसूल विभागाने केलेल्या एका कारवाईतून उघड झाली आहे.

Sand smugglers from Chandrapur | चंद्रपुरातून वणीत वाळूची तस्करी

चंद्रपुरातून वणीत वाळूची तस्करी

Next
ठळक मुद्देमहसूल विभागाने टिप्पर पकडले : घुग्गूसच्या वर्धा नदीतून रेतीची चोरी

लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : वणी तहसील कार्यालयाच्या रॅपेड अ‍ॅक्शन टिमने तालुक्यातील अनेक रेती तस्करांच्या मुसक्या आवळल्यानंतर आता परजिल्ह्यातील वाळू तस्करांनी डोकेवर काढले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर वणी शहरात अवैधरित्या रेती आणली जात असल्याची बाब महसूल विभागाने केलेल्या एका कारवाईतून उघड झाली आहे.
वणी येथे नव्यानेच रूजू झालेले तहसीलदार धनमने यांनी पदाची सुत्रे हाती घेताच, रेती तस्करांना रडारवर घेतले. यादरम्यान अनेक तस्करांविरूद्ध कारवाई करून त्यांच्याकडून लाखो रूपयांचा दंड वसुल केला. त्यामुळे वणी तालुक्यातील तस्करांचे धाबे दणाणले आहे. सध्या वणी शहरात मोठ्या प्रमाणावर बांधकामे केली जात असून त्यासाठी रेतीची गरज आहे. त्यातच रेती घाटांचे लिलाव अद्याप न झाल्याने स्थानिक पातळीवर चांगल्या प्रतीची रेती मिळणे कठीण झाले आहे. परिणामी बांधकामे थांबली आहेत.
ही बाब हेरून चंद्रपूर जिल्ह्यातील तस्करांनी वणी शहरात रेती पुरविण्याचा गोरखधंदा सुरू केला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातून अनेक नद्या वाहतात. यंदा चांगला पाऊस झाल्याने या नद्यांमध्ये चांगल्या प्रतीची रेती आली आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक तस्करीच्या वाळू तस्करीच्या धंद्यात उडी घेतली आहे. यातून हे तस्कर लाखो रूपयांची कमाई करीत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गूस येथील वर्धा नदीतून टिप्परद्वारे मोठ्या प्रमाणावर वणी शहरात रेती आणली जात असल्याची गोपनीय माहिती तहसीलदार श्याम धनमने यांना मिळाल्यानंतर त्यांनी रॅपेड अ‍ॅक्शन टीम तयार केली. या टीमने शनिवारी पहाटे २.१५ वाजता सापळा रचून घुग्गूसकडून येणारा टिप्पर पकडला. या कारवाईने आता परजिल्ह्यातून येणाऱ्या रेतीला काही अंशी बे्रक लागला आहे. ही कारवाई ठाणेदार बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ना.तहसीलदार व्ही.व्ही.पवार, मंडळ अधिकारी गजानन देठे, अरूण मडावी, तलाठी दत्ता तुपे आदींनी केली.

Web Title: Sand smugglers from Chandrapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :sandवाळू