संस्कृत भाषा सकल ऐक्याचे आधारसूत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 09:47 PM2018-02-19T21:47:16+5:302018-02-19T21:47:42+5:30

जगातील प्राचिनतम भाषा म्हणून संस्कृत भाषेला ओळखले जाते. भारतीय राज्यघटनेत १५ भाषा मान्यताप्राप्त आहेत. ६०० भाषा बोलल्या जातात. भारतीय ऐक्याचे आधारसूत्र रूपात संस्कृत भाषा प्रतिष्ठीत आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.

Sanskrit language gross formula | संस्कृत भाषा सकल ऐक्याचे आधारसूत्र

संस्कृत भाषा सकल ऐक्याचे आधारसूत्र

Next
ठळक मुद्देमदन येरावार : संस्कृत जनपद संमेलन, संस्कृत भारती व आयुर्वेद महाविद्यालयाचे आयोजन

आॅनलाईन लोकमत
यवतमाळ : जगातील प्राचिनतम भाषा म्हणून संस्कृत भाषेला ओळखले जाते. भारतीय राज्यघटनेत १५ भाषा मान्यताप्राप्त आहेत. ६०० भाषा बोलल्या जातात. भारतीय ऐक्याचे आधारसूत्र रूपात संस्कृत भाषा प्रतिष्ठीत आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.
संस्कृत भारती तथा आयुर्वेद महाविद्यालयाच्या वतीने आयुर्वेद महाविद्यालय सभागृहात आयोजित संस्कृत जनपद संमेलनाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आयुर्वेद सेवासमितीचे अध्यक्ष डॉ. केदार राठी होते. संस्कृत भारतीचे प्रांत मंत्री श्रीनिवास वर्णेकर, यवतमाळ अर्बन बँकेचे अध्यक्ष अजय मुंधडा, आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजीव मुंदाने, यवतमाळ शाखेच्या अध्यक्षा शैलजा रानडे उपस्थित होत्या.
उद्घाटन समारंभाच्या प्रारंभी संस्कृतातील विज्ञान व वस्तू प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले. सभागृहात संमेलन गीतानंतर भक्ती जोशी हिने सरस्वती वंदना केली. प्रमुख वक्ता तुकाराम चिंचणीकर म्हणाले, आपण वेदाकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलेच नाही. आयुर्वेदातल्या अनेक गोष्टी यामुळे समाजापुढे आल्याच नाही.
प्रास्ताविक करताना डॉ. शैलजा रानडे म्हणाल्या, संस्कृतने संस्कार, संस्कृती आणि संघटनमूल्य प्रतिपादिले. त्यांनी संस्कृत भारतीच्या कार्याचे स्वरूप विशद केले. याप्रसंगी विनायक दाते, सतीश फाटक, विनायक कशाळकर, भीमराव गायकवाड, मोहन केळापुरे, मोहन जोशी, प्राचार्य तिवारी, तात्या कुंटे, मधुकर रानडे, उदय पांडे, महेश जोशी, मनिषा गुबे, डॉ. कुळकर्णी, या संस्कृत भारतीस सहकार्य करणाºया विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन मंजुश्री नेव्हल यांनी केले. आभार पुष्पा वरगंटीवार यांनी मानले.

Web Title: Sanskrit language gross formula

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.