सरपंचांना मिळाले दमदार नेतृत्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:43 AM2021-09-19T04:43:05+5:302021-09-19T04:43:05+5:30
महागाव : तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंचांना दमदार नेतृत्व मिळाले आहे. सरपंच संघटनेची नुकतीच नव्याने स्थापना करण्यात आली. तालुका सरपंच संघटनेच्या ...
महागाव : तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंचांना दमदार नेतृत्व मिळाले आहे. सरपंच संघटनेची नुकतीच नव्याने स्थापना करण्यात आली.
तालुका सरपंच संघटनेच्या अध्यक्षपदी टेंभीचे सरपंच अमोल चिकणे, तर उपाध्यक्षपदी तिवरंगच्या सरपंच प्रा. जयश्री सुनील राठोड यांची निवड करण्यात आली आहे. येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात सरपंच संघटनेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसाठी बैठक घेण्यात आली. बैठकीला तालुक्यातील ७६ ग्रामपंचायतींच्या सरपंचांनी हजेरी लावली. संघटनेचे ध्येयधोरण, संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक ग्रामपंचायतीअंतर्गत विकासात्मक कामादरम्यान विचारांची देवाण-घेवाण, शासनावर होणारा संघटनेचा प्रभाव, यावर चर्चा करण्यात आली.
१५ वर्षांचा अनुभव असलेले वनोलीचे सरपंच नरेंद्र जाधव यांनी मार्गदर्शन केले. संघटनेच्या सचिवपदी वाकानचे सरपंच अश्वजीत भगत, कोषाध्यक्ष विकास जाधव धारमोहा, सरचिटणीस श्रीधर भगवानकर कलगाव, प्रसिद्धीप्रमुख गुणवंत राठोड यांची निवड झाली. सदस्य म्हणून दिनेश रावते, बापूसाहेब देशमुख, दिलीप शिंदे, अविनाश पवार, वैभव बर्डे, नरेंद्र जाधव, जयश्री चव्हाण, गजानन बुढाल, इंदल राठोड, शीतल भिसे, दिनेश कदम, शेख युसुफ, तातेराव वानखेडे, देविदास बुरकुले, गायत्री शिंदे यांची निवड करण्यात आली.
180921\1526-img-20210917-wa0024.jpg
सरपंच संघटनेचे नवनिर्वाचित अध्यक्ष अमोल चिकणे आणि उपाध्यक्ष जयश्री राठोड