ग्रामसेवकांच्या संपामुळे सरपंच संतापले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2019 09:47 PM2019-09-13T21:47:58+5:302019-09-13T21:48:39+5:30
सचिवांच्या विविध मागण्या असल्या तरी त्यापैकी आवश्यक मागण्या मान्य कराव्यात, अशी सरपंचांची भूमिका आहे. राज्य व जिल्हास्तरावरील मागण्यांवर त्वरित तोडगा काढणे आवश्यक आहे. त्यांच्या रास्त मागण्या मान्य करून संपावर तोडगा काढावा, अशी मागणी सरपंचांनी सीईओंमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : ग्रामसेवकांनी कामबंद आंदोलन सुरू केल्यामुळे ग्रामीण भागात विकासाचा खोळंबा होत आहे. ग्रामपंचायती अनाथ झाल्या आहे. ग्रामसेवकांच्या संपावर तातडीने तोडगा काढण्याची मागणी सरपंचांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
ग्रामसेवकांनी विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे गावांचा विकास ठप्प झाला आहे. पावसाळ्यामुळे ग्रामीण भागात बदलत्या वातावरणातून आरोग्य समस्या वाढल्या आहे. साथीचे रोग बळावत आहेत. याशिवाय कर वसुली व विविध कामे खोळंबली आहे. संपामुळे सरपंच हतबल झाले आहे. सचिव कामावर नसल्याने त्यांच्यासमोर अडचण निर्माण झाली आहे. ग्रामस्थांच्या संतापाला सरपंचांना सामोरे जावे लागत आहे.
सचिवांच्या विविध मागण्या असल्या तरी त्यापैकी आवश्यक मागण्या मान्य कराव्यात, अशी सरपंचांची भूमिका आहे. राज्य व जिल्हास्तरावरील मागण्यांवर त्वरित तोडगा काढणे आवश्यक आहे. त्यांच्या रास्त मागण्या मान्य करून संपावर तोडगा काढावा, अशी मागणी सरपंचांनी सीईओंमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. पालकमंत्री, महसूल राज्यमंत्र्यांनाही निवेदन देण्यात आले. यावेळी गहुली हेटी, लासीना, चिचबर्डी, टेंभुरणीचे सरपंच संदेश राठोड, कन्हैया राठोड, जयश्री राठोड, महादेव वाघाडे आदी उपस्थित होते.