सातव यांनी दिला विद्यार्थ्यांना यशाचा मंत्र
By admin | Published: September 21, 2015 02:27 AM2015-09-21T02:27:07+5:302015-09-21T02:27:07+5:30
परदेशातील लोकांना आॅनलाईन संगीत शिकविणारे दृष्टीहीन संगीत तज्ज्ञ यांनी विद्यार्थ्यांना यशाचा मंत्र दिला.
विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद : आत्मविश्वासाने ध्येयाच्या मागे लागल्यास यशप्राप्ती नक्की
यवतमाळ : परदेशातील लोकांना आॅनलाईन संगीत शिकविणारे दृष्टीहीन संगीत तज्ज्ञ यांनी विद्यार्थ्यांना यशाचा मंत्र दिला. येथील नंदूरकर विद्यालयात शनिवारी आयोजित ‘आम्ही असे घडलो’ उपक्रमांतर्गत राहुल सातव यांचा प्रेरणादायी कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आला. यावेळी त्यांना विद्यार्थ्यांसोबत मनमोकळा संवाद साधला.
आई-वडिलांची सेवा करीत त्यांनी दिलेल्या शिकविणीवर विश्वास ठेऊन जीवनातील यश गाठा, आपल्या अंगी आत्मविश्वास बाळगा, जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही, केवळ ध्येय आवश्यक असून त्या अनुषंगाने परिश्रम करणे गरजेचे आहे. मी यशस्वी होणारच, या विचाराने ध्येयाच्या मागे लागा असे प्रतिपादन संगीत तज्ज्ञ राहूल सातव यांनी केले. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला प्रारंभ झाला. यावेळी विविध मान्यवरांनीसुद्धा आपले विचार व्यक्त केले. त्यानंतर जयंत जावरे यांनी राहूल सातव यांची प्रगट मुलाखत घेतली. त्यावरील प्रश्नांना उत्तर देत प्रमुख मार्गदर्शनपर भाषणात राहूल सातव यांनी आपल्या सुरेल आवाजात भजन ऐकवित आपल्या जीवनातील विविध प्रसंग विद्यार्थ्यांना सांगितले. परिस्थितीवर मात करून यश मिळविण्याची प्रेरणा दिली. बालपणीचे अनुभव सांगताना विद्यार्थ्यांसोबत मुक्तपणे संवाद साधला. या कार्यक्रमाला डॉ. प्रकाश नंदूरकर, मुख्याध्यापिका ज्योती बावीसकर, वैदेही नायगावकर आदींसह शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)