विविध शैक्षणिक उपक्रमांसाठी सतीश मुस्कंदे यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 11:01 PM2017-10-28T23:01:13+5:302017-10-28T23:01:26+5:30
केळझर तांडा येथे झालेल्या कार्यक्रमात शिक्षक सतीश मुस्कंदे यांचा स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर आणि आमदार राजू तोडसाम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्णी : केळझर तांडा येथे झालेल्या कार्यक्रमात शिक्षक सतीश मुस्कंदे यांचा स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर आणि आमदार राजू तोडसाम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागातर्फे सतीश मुस्कंदे यांची आंतरराष्ट्रीय शैक्षणिक दौरा सिंगापूरसाठी निवड झाली होती. आंतरराष्ट्रीय शैक्षणिक आदानप्रदान कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्रातील शाळांना आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त होऊन विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठीच्या प्रयत्नांचा भाग म्हणून हा शैक्षणिक दौरा होता. याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले.
शहीद अमर जवान प्रतिष्ठान केळझर तांडा यांच्यावतीने शहीद ज्ञानेश्वर आडे व शहीद साहेबराव चव्हाण यांना आदरांजली कार्यक्रमात मुस्कंदे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नीलय नाईक, राजेंद्र डांगे, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश राठोड, सभापती राजू पाटील, उपसभापती नुनेश्वर आडे, डॉ. रामचरण चव्हाण आदी प्रामुख्याने उपस्थित होते.