नेर येथे सत्यशोधक भीम जयंती महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 12:30 AM2018-04-09T00:30:30+5:302018-04-09T00:30:30+5:30
भीम तरुण उत्साही मंडळाच्यावतीने येथे सत्यशोधक भीम जयंती महोत्सव ११ ते १४ एप्रिलपर्यंत आयोजित करण्यात आला आहे. समता रॅलीने महोत्सवाला सुरुवात होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : भीम तरुण उत्साही मंडळाच्यावतीने येथे सत्यशोधक भीम जयंती महोत्सव ११ ते १४ एप्रिलपर्यंत आयोजित करण्यात आला आहे. समता रॅलीने महोत्सवाला सुरुवात होणार आहे. शिवाजीनगरातील महात्मा जोतिबा फुले स्मारकाजवळून रॅलीला सुरुवात होईल. नगरपरिषदेचे उपाध्यक्ष पवन जयस्वाल हे उद्घाटक आहेत.
महोत्सवात महिला प्रबोधन पर्व अंतर्गत डॉ.सीमा मेश्राम यांचे ‘आंबेडकरी आंदोलन-स्त्रियांची भूमिका’ या विषयावर मार्गदर्शन होणार आहे. महिला सक्षमीकरण आणि आजच्या महिलांची जबाबदारी या विषयावर सुनयना यवतकर या प्रबोधन करतील. रेखा धांदे यांच्या अध्यक्षतेत प्रबोधन पर्व पार पडणार आहे.
संबोधी क्रिएशन निर्मित डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथावर आधारित दोन अंकी महानाट्य ‘धम्मदीक्षा’ सादर होणार आहे. प्रा.डॉ.शांतरक्षित गावंडे लिखित, अविश बनसोड दिग्दर्शित आणि बंडू बोरकर निर्मित या महानाट्याचे प्रास्ताविक बापुराव रंगारी हे करणार आहे.
प्रबोधन सत्रात सामाजिक, आर्थिक, राजकीय सध्य स्थिती आणि आंबेडकरी समाजाची भूमिका यावर सिद्धांत मोकळे हे विचार मांडतील. ‘संध्या निळ्या पाखरांची’ हा गौतम पाढेन यांचा प्रबोधन कार्यक्रम होईल. ध्वजारोहण, वंदना, मोटरसायकल रॅली काढली जाणार आहे. यावेळी अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष वनिता मिसळे राहतील.
प्रमुख पाहुणे म्हणून लक्ष्मण मिसळे, प्रा.नाजूक धांदे, सुरेखा मिसळे, गौतम मिसळे, रत्ना मिसळे, रामचंद्र मिसळे, भरत दंदे, प्रा.आठवले, गणेश राऊत, वंदना मिसळे, मुकुल परधने, रजनी मिसळे, बापुराव रंगारी, बंडू बोरकर, शरद मोरे, समाधान मिसळे, सिद्धांत मिसळे, राहूल मिसळे, सुलोचना भोयर, करुणा मिसळे, चंदा मिसळे, पूजा शेंडे, गंगाधर मिसळे, दीपक मिसळे, प्रशिक धांदे, विनोद अंबोरे, नितीन बनसोड, लक्ष्मण वानखडे आदी उपस्थित राहतील. या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजन समितीने केले आहे.