पोलीस शिपाई नव्हे आता ‘पोलीस अंमलदार’ म्हणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2020 03:04 PM2020-10-24T15:04:32+5:302020-10-24T15:04:58+5:30

Police Yawatmal News महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्यांना यापुढे अंमलदार म्हणून संबोधले जाणार आहे.

Say 'police Amaldar' now, not 'police Shipai' | पोलीस शिपाई नव्हे आता ‘पोलीस अंमलदार’ म्हणा

पोलीस शिपाई नव्हे आता ‘पोलीस अंमलदार’ म्हणा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्यांना यापुढे अंमलदार म्हणून संबोधले जाणार आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक (आस्थापना) राजेश प्रधान यांनी २३ ऑक्टोबर रोजी या संंबंधीचे आदेश जारी केले. पोलीस दलातील पोलीस शिपाई, नायक पोलीस शिपाई, जमादार, सहायक फौजदार यांना पोलीस कर्मचारी संबोधले जाते. परंतु यापुढे पोलीस कर्मचारी ऐवजी पोलीस अंमलदार असा शब्द प्रयोग करण्याचे आदेश जारी झाले आहे. पोलीस घटक कार्यालयाकडून शासनाला, महासंचालक कार्यालयाला व इतर घटक कार्यालयांना होणाऱ्या पत्र व्यवहारात हा बदल तातडीने करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

पोलीस कर्मचाऱ्यांना होता आक्षेप
पोलीस कर्मचाऱ्यांना शिपाई या संबोधनावर आक्षेप होता. हा उल्लेख जणू चपराशी पदासारखा वाटत असल्याचे अनेकांची भावना होती. अखेर त्याची दखल घेत पोलीस महासंचालक कार्यालयाने आता पोलीस शिपाई नव्हे तर पोलीस अंमलदार असे संबोधण्याचे आदेश जारी केले आहे.

Web Title: Say 'police Amaldar' now, not 'police Shipai'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस