कर्ज मंजूर झाल्याचे सांगत महिलेला सव्वालाखांचा गंडा

By सुरेंद्र राऊत | Published: May 20, 2023 05:17 PM2023-05-20T17:17:33+5:302023-05-20T17:18:02+5:30

Yawatmal News बाभूळगाव तालुक्यात दुसऱ्यांदा पंचायत समितीतील योजनेच्या नावाने गरीब शेतकरी महिलेला फसविण्यात आले आहे.

Saying that the loan has been approved, the woman has a sum of Rs | कर्ज मंजूर झाल्याचे सांगत महिलेला सव्वालाखांचा गंडा

कर्ज मंजूर झाल्याचे सांगत महिलेला सव्वालाखांचा गंडा

googlenewsNext

सुरेंद्र राऊत

यवतमाळ : बाभूळगाव तालुक्यात दुसऱ्यांदा पंचायत समितीतील योजनेच्या नावाने गरीब शेतकरी महिलेला फसविण्यात आले आहे. तालुक्यातील वेणी येथे दोघेजण शुक्रवारी सकाळी ८:३० वाजता पोहोचले. पंचायत समितीतील अधिकारी असल्याची बतावणी केली. तुम्हाला पाच लाख रुपयांचे लोण मंजूर झाले आहे. त्यासाठी ७५ हजार रुपये भरावे लागेल असे सांगितले. घरी एकट्या असलेल्या महिलेला बोलण्यात गुंतवून तिच्याजवळून एक लाख २५ हजारांचा मुद्देमाल घेवून पोबारा केला. 


साधना रामदास राऊत रा. वेणी असे या शेतकरी महिलेचे नाव आहे. त्या घरी एकट्या असताना दोनजण सकाळीच घरी आले. त्यांनी तुम्हाला बैलबंडी व शेत कुंपनासाठी पाच लाखांचे कर्ज मंजूर झाल्याचे सांगितले. या कर्जाचा लाभ घेण्यासाठी तत्काळ ७५ हजार रुपयांचा भरणा करा अशी बतावणी केली. मात्र साधना राऊत यांनी माझ्याकडे केवळ पाच हजार रुपये आहे. आता उर्वरित ७० हजार रुपये देवू शकत नाही. थोड्या दिवसानंतर ७५ हजारांची जुळवाजुळव शक्य असल्याचे सांगितले. त्यासाठी सोन्याची पोत गहाण ठेवावी लागणार असल्याचेही त्यांनी भामट्यांना सांगितले. यावर त्या दोघांनी ती पोत आम्हाला द्या, पैसे भरण्याची गरज नाही, असे म्हणून फिर्यादीस विश्वासात घेवून तिच्याजवळून एक लाख २० हजार रुपयांची सोन्याची पोत व रोख पाच हजार असा एक लाख २५ हजारांचा मुद्देमाल घेवून पळ काढला.

घरची मंडळी परत आल्यानंतर महिलेने सांगितलेला प्रकार ऐकून सर्वांना धक्काच बसला. शासकीय अधिकारी बनून आलेल्या दोघांनी सव्वालाखांनी फसविले. या प्रकरणी बाभूळगाव पोलिसांनी कलम ४५२, ४०६, ४२०, १७०, ३४ भादंविनुसार अज्ञात दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Saying that the loan has been approved, the woman has a sum of Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.