मृतदेह सापडल्याने २८ लाखांच्या घोटाळ्याची गुंतागुंत वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 16:55 IST2020-02-29T16:54:55+5:302020-02-29T16:55:08+5:30
एटीएममध्ये टाकण्यासाठी स्टेट बँकेतून २८ लाखांची रक्कम उचल केल्यापासून रहस्यमयरित्या बेपत्ता असलेला कर्मचारी संतोष वाटेकर हा अद्यापही पोलिसांच्या हाती लागला नाही.

मृतदेह सापडल्याने २८ लाखांच्या घोटाळ्याची गुंतागुंत वाढली
यवतमाळ: एटीएममध्ये टाकण्यासाठी स्टेट बँकेतून २८ लाखांची रक्कम उचल केल्यापासून रहस्यमयरित्या बेपत्ता असलेला कर्मचारी संतोष वाटेकर हा अद्यापही पोलिसांच्या हाती लागला नाही. मात्र शुक्रवारी रात्री चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत छिन्नविछीन्न अवस्थेत एक मृतदेह आढळून आला.
सदर मृतदेह संतोषचा तर नाही ना, याची खातरजमा करण्यासाठी त्याचे नातेवाईक घटनास्थळी पोहोचले. त्याच्या भावाने मृतदेह संतोषचाच असल्याचे ओळखले. त्यानंतर मृतदेह वणीत आणण्यात आला. मात्र सदर मृतदेह आपल्या पतीचा नसल्याचा दावा संतोषच्या पत्नीने केला असून मृतदेह स्विकारण्यास नकार दिल्याने पोलिसांपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. सायंकाळी ४.३० वाजेपर्यंत सदर मृतदेह संतोष वाटेकर याच्या वणीतील विठ्ठलवाडी परिसरातील घरापुढे ठेऊन होता.