शासकीय रक्तपेढीत तपासणी कीटचा तुटवडा

By admin | Published: September 21, 2015 02:32 AM2015-09-21T02:32:09+5:302015-09-21T02:32:09+5:30

येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय समस्यांचे माहेरघर बनले आहे.

Scarcity of the insect checking in government blood bank | शासकीय रक्तपेढीत तपासणी कीटचा तुटवडा

शासकीय रक्तपेढीत तपासणी कीटचा तुटवडा

Next

रूग्णांची परवड : खासगी पेढीतून घ्यावे लागते रक्त
यवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय समस्यांचे माहेरघर बनले आहे. येथील कोणत्याच विभागाचे काम सुरळीतपणे सुरू नाही. अनेक अडचणींचा सामना येथील यंत्रणेला करावा लागत आहे. रक्तपेढीत तपासणीसाठी लागणारी एलायझर कीट नसल्याने रक्त पिशव्याच मिळणे बंद झाले आहेत. अनेक रुग्णांना खासगीतून रक्ताची व्यवस्था करावी लागत आहे. पुरवठादाराने किटी दिल्या नसल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे.
रक्तदात्याने रक्तपेढीत रक्त जमा केल्यानंतर त्या रक्ताच्या विविध प्रकारच्या पाच तपासण्या केल्या जातात. यासाठी ‘एलायझर’ किटचा वापर केला जातो. मात्र १२ सप्टेंबरपासून येथील किट संपल्याने रक्त तपासणीचे कामच खोळंबले आहे. पेढीत तब्बल २० रक्त पिशव्या चाचणीअभावी पडून आहेत. यातच रक्तदान शिबिराच्या माध्यमातून जवळपास शंभरावर रक्तपिशव्या गोळा झाल्या आहेत. या पिशव्याचीही चाचणी झालेली नाही. रक्त पिशवीवर चोवीस तासाच्या आत तपसणी करणे आवश्यक असते. त्यानंतर या रक्ताचा उपयोग होत नाही. नाईलाजाने रक्त पिशव्या स्टोअरमध्ये ठेवाव्या लागल्या.
वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयच्या प्रशासनाचा डोलारा पूर्णत: कोसळला आहे. अधिष्ठाताचे नियंत्रण नसल्याने अनेक समस्या येथे सातत्याने उद्भवत आहेत. पुरवठादारांकडून नियमित पुरवठा केला जात नाही. अनेक अत्यावश्यक औषधी येथे उपलब्ध होत नाही.
(कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Scarcity of the insect checking in government blood bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.