शेंदरी बोंडअळी उठली शेतकऱ्यांच्या जीवावर

By admin | Published: September 2, 2016 02:27 AM2016-09-02T02:27:27+5:302016-09-02T02:27:27+5:30

पावसाने मध्यंतरी डोळे वटारल्यानंतर पुन्हा हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत असतानाच जिल्ह्यातील काही भागात...

The scarlet-colored bollworm raised the life of the farmers | शेंदरी बोंडअळी उठली शेतकऱ्यांच्या जीवावर

शेंदरी बोंडअळी उठली शेतकऱ्यांच्या जीवावर

Next

उमरखेड-महागावला घेरले : बीटी कपाशीवर प्रादुर्भाव
यवतमाळ : पावसाने मध्यंतरी डोळे वटारल्यानंतर पुन्हा हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत असतानाच जिल्ह्यातील काही भागात बीटी कपाशीवर शेंदरी बोंडअळीचा प्रादूर्भाव दिसून आला. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांमध्ये धास्ती असून या अळीच्या व्यवस्थापनाचे आव्हान शेतकऱ्यांसमोर आहे.
प्रादुर्भावाची सध्याची टक्केवारी पाहता गुलाबी बोंडअळी येणाऱ्या काळात निश्चितच शेतकऱ्यांचे मोठे नुकसान करू शकते. उमरखेड-महागाव-राळेगाव परिसराला या बोंडअळीने घेराव घातला असून इतरही तालुक्यांमध्ये तिचा प्रादूर्भाव असू शकतो. पांढरकवडा आणि झरीजामणी तालुक्यात शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून आला नाही. राळेगावमध्ये अत्यल्प (0.3) टक्के) आढळून आला.
कृषी विज्ञान केंद्र, विभागीय कृषी संशोधन केंद्र आणि कृषी विभागाचे सर्व उपविभागीय कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यवतमाळ यांच्या संयुक्त निदान चमुने नुकत्याच केलेल्या प्रक्षेत्र भेटी, सर्वेक्षणात उमरखेड तालुक्यामध्ये विडुळ येथे शेतामध्ये बीटी कपाशी आरसीएच ६५९ फर्स्ट क्लास आढळून आला. यापुढे शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव इतर क्षेत्रामध्ये सुध्दा वाढु शकतो. यासाठी शेतकऱ्यांनी शेंदरी बोंडअळीचे व्यवस्थापनाच्या दृष्टीने वेळीच सावध होणे गरजेचे आहे.
बोंडअळ्यांच्या व्यवस्थापनासाठी बीटी तंत्रज्ञान तयार करण्यात आले, त्या बोंडअळ्यांच्या व्यवस्थापनासाठी बीटी तंत्रज्ञान तयार करण्यात आले. त्या बोंड अळ्यांचाच प्रादुर्भाव बीटी कपाशीवर आढळून येत आहे. मागील वर्षी गुलाब (शेंदरी) बोंडअळीचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणात बीटी उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतावर नोंदविण्यात आला. प्रथम पांढुरकी असते. मोठी झालेली अळी गुलाबी रंगाची होते. पूर्ण वाढलेल्या अळीची लांबी १८ ते १९ मिमी असते. गुलाबी बोंडअळीला शेंदरीअळी सुद्धा म्हणतात. अंड्यातून बाहेर पडलेल्या अळ्या एकदम बोंडात शिरल्यानंतर बोंडातच अळी अवस्था पूर्ण करते अळी अवस्था आठ ते २८ दिवसांची असते त्यानंतर बोंडात गोल छिद्र करून कोषाअवस्थेत जाण्यासाठी बाहेर पडते आणि जमिनीवर पडलेल्या पालापाचोळ्यात किंवा ढेकलाखाली किंवा उमलेलेल्या बोंडातील कापसावर कोषामध्ये जाते. कोषावस्था सहा ते २० दिवसांची असते. आपल्या भागात कोरडवाहू कापूस पिकांवर गुलाबी अळीचा प्रादुर्भाव आॅक्टोबर महिन्यामध्ये हिरव्या बोंडामध्ये आढळून येतो. या बोंडअळीची वाढ साधारणत: उष्ण आणि ढगाळ वातावरण आणि हलक्या पावसाच्या सरीची जोड असल्यास झपाट्याने होते. सरकीतील तेलाचे प्रमाण घटते आणि बियाण्यांची उगवणशक्ती कमी होते, अळीचे वेळीच व्यवस्थापन करावे. शेतकऱ्यांनी जिल्हा अधिक्षक कृषी कार्यालय, कृषी विज्ञान केंद्र, तालुका कृषी अधिकारी व शासनाच्या सबंधित कार्यालयांशी संपर्क साधून मार्गदर्शन घ्यावे. (प्रतिनिधी)


गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन कसे करावे ?
नियमित बीटी कपाशीच्या शेताचे सर्वेक्षण करून गुलाबी बोंड अळ्यांनी आर्थिक नुकसानीची संकेत पातळी गाठली किंवा नाही, हे पाहण्यासाठी आपल्या कपाशी पिकाचे दर आठवड्याला शेतामध्ये फिरून गुलाबी बोंड अळ्याचे अस्तित्व आणि प्रादुर्भावाबाबत निरीक्षण करावे. ही झाडे शेताचे प्रतिनिधीत्व करतील, अशी निवडावीत. या झाडावरील एकंदर पात्या, कळ्या, फुले आणि हिरवी बोंडे मोजावीत आणि यापैकी गुलाबी बोंड अळ्यांनी छिद्र केलेली किती आहेत, ती काळजीपूर्वक पाहून मोजावीत. हे नुकसानीचे प्रमाण पाच टक्के किंवा त्यापेक्षा जास्त आढळून आल्यास गुलाबी बोंडअळ्याच्या नियंत्रणासाठी उपाययोजना करावी. नुकसानीचे पाच टक्के प्रमाण ही बोंड अळ्यासाठी आर्थिक नुकसानीची पातळी निश्चित करण्यात आली आहे. ही नुकसानीची पातळी पिकाच्या वाढीच्या अवस्थेवर, कपाशीच्या जातीवर अवलंबून असते. बीटी रहित कपाशी बियाण्याची किंवा भेंडीची उशिरा लागवड करावी, गुलाबी बोंडअळ्याच्या व्यवस्थापनाकरीता हंगामामध्ये ट्रायकोग्रामा बॅक्ट्री या परोपजीवी किटकाची अंडी असलेली ट्रायकोकार्डस याप्रमाणे शेतात लावावेत, कपाशीचे पिक डिसेंबरच्या आत संपविणे आवश्यक आहे. फवारणीबाबत मार्गदर्शन घ्यावे.

Web Title: The scarlet-colored bollworm raised the life of the farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.