‘वायपीएस’मध्ये श्लोक स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 10:14 PM2019-07-16T22:14:45+5:302019-07-16T22:15:01+5:30
विद्यार्थ्यांची भाषाशैली, आत्मविश्वास, धार्मिक संस्कार याबाबी लक्षात घेता तसेच या गुणांसाठी प्रोत्साहन मिळावे याकरिता यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये श्लोक स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये पहिली व दुसरीचे १५० विद्यार्थी सहभागी झाले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : विद्यार्थ्यांची भाषाशैली, आत्मविश्वास, धार्मिक संस्कार याबाबी लक्षात घेता तसेच या गुणांसाठी प्रोत्साहन मिळावे याकरिता यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये श्लोक स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये पहिली व दुसरीचे १५० विद्यार्थी सहभागी झाले होते.
विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे भाषाशैली सादर करण्याचा प्रयत्न केला. यात पहिल्या वर्गातून प्रथम क्रमांक श्रीकर धावले याने मिळविला. द्वितीय क्रमांक आर्या वैद्य, तर तृतीय क्रमांक अवधूत कहालेकर याने प्राप्त केला. नसिफा बोरा, अन्वी गाडेकर, देवांश धिरे यांनी प्रोत्साहनपर बक्षीस प्राप्त केले. दुसऱ्या वर्गातून प्रथम क्रमांक तृष्णा सराफ, द्वितीय आयूष चिंचोळकर, तृतीय हेमांशी सरोळकर यांनी, तर प्रोत्साहनपर बक्षीस यशस्वी वडतकर, रेखांश पिसे, आर्यन गोपाल देशमुख यांनी प्राप्त केला. या स्पर्धेसाठी मनीषा डगवाल, छाया धलवार, अंजली गुजर, संघप्रमुख नीलम शर्मा आदींनी पुढाकार घेतला. स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळा समितीचे अध्यक्ष किशोर दर्डा, प्राचार्य जेकब दास यांनी कौतुक केले.