लसीकरणाला जाण्यासाठी स्कूल बस सेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:44 AM2021-04-23T04:44:23+5:302021-04-23T04:44:23+5:30
उमरखेड : तालुक्यातील सहा प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच काही उपकेंद्रात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरणाला सुरुवात झाली आहे. लसीकरण ...
उमरखेड : तालुक्यातील सहा प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच काही उपकेंद्रात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरणाला सुरुवात झाली आहे. लसीकरण केंद्रापर्यंत वाहतुकीसाठी मॉर्डन पब्लिक स्कूलने मोफत बस उपलब्ध करून दिल्या आहे.
तालुक्यातील पोलीस पाटील, सरपंच यांच्या मागणीनुसार गावातील ५० नागरिकांची नोंदणी करून त्यांना मोफत बस उपलब्ध करून दिली जात आहे. बस निर्जंतुकीकरण करून दिल्या जातात. सोशल डिस्टन्स पाळून गरजूंनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मॉर्डन पब्लिक स्कूल संस्थेच्या अध्यक्ष रेणुश्री देवसरकर यांनी केले आहे.
लसीकरण मोहिमेत कोणत्याही गावातील गरजवंत नागरिक, महिला वंचित राहू नये, हा या मागे प्रमुख हेतू आहे. प्रत्येकाने या बाबतीत पुढाकार घ्यावा, असे संस्थाध्यक्ष रेणुश्री देवसरकर यांनी म्हटले आहे.