शाळेतील मुलांचे दप्तर पुढच्या वर्षी होणार आणखी हलके

By अविनाश साबापुरे | Published: July 19, 2023 06:24 AM2023-07-19T06:24:46+5:302023-07-19T06:25:33+5:30

केंद्र सरकारने २०२० मध्ये घोषित केलेल्या नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी आता हळूहळू सुरू होत आहे

School children's portfolio will be lighter next year | शाळेतील मुलांचे दप्तर पुढच्या वर्षी होणार आणखी हलके

शाळेतील मुलांचे दप्तर पुढच्या वर्षी होणार आणखी हलके

googlenewsNext

अविनाश साबापुरे

यवतमाळ : विद्यार्थ्यांचे दप्तर हलके करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एकात्मिक पाठ्यपुस्तकांचा प्रयोग सुरू केला आहे. मात्र, पुढच्या वर्षी दप्तराचे ओझे आणखी कमी होणार असून, त्यासाठी राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यात खास तरतूद करण्यात आली आहे. प्रत्येक धड्यानंतर शिक्षकांसाठी अध्यापनाच्या दृष्टीने दिल्या जाणाऱ्या सूचना पाठ्यपुस्तकातून वगळल्या जाणार आहेत. त्यामुळे पुस्तकाचा आकार जवळपास अर्धाच होणार आहे. 

केंद्र सरकारने २०२० मध्ये घोषित केलेल्या नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी आता हळूहळू सुरू होत आहे. धोरणानुसार देशभरात सारखीच शिक्षणपद्धती राबविण्यासाठी राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा तयार करण्यात आला आहे. ६२८ पानांच्या या आराखड्यात विद्यार्थी-शिक्षकांसाठी विशेष तरतुदी आहेत. 

‘अध्ययन, अध्यापन, अभ्यासक्रमाबाबतचा नवा दृष्टिकोन’ असे स्वतंत्र चॅप्टर देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, प्रत्येक वर्गाच्या प्रत्येक पुस्तकात धडा संपल्यानंतर एका पानावर शिक्षकांसाठी सूचना तसेच नोंदी दिलेल्या असतात. परंतु, या नोंदींमुळे पुस्तकाचा आकार अनावश्यकरीत्या वाढतो. या नोंदी वगळण्यात येऊन पुस्तकाचा आकार जवळपास अर्धा होण्याची शक्यता आहे.  

प्रत्येक पुस्तकाच्या दोन आवृत्त्या 
पुढच्या वर्षीपासून पाठ्यपुस्तके दोन स्वरूपांत छापली जातील. एक आवृत्ती विद्यार्थ्यांसाठी (टेक्स्ट बुक), दुसरी शिक्षकांसाठी (टेक्स्ट बुक प्लस) असेल. शिक्षक आवृत्तीमध्ये प्रत्येक धड्यानंतर सूचना, नोंदी, क्यूआर कोड असतील.   

डिजिटल वाचनावर भर
सोशल मीडियातील मजकुराचे सुरक्षित आणि उपयुक्त वाचन कसे करावे, यासाठी अभ्यासक्रम आराखड्यात ‘बायलिट्रसी’ ही संकल्पना मांडण्यात आली आहे.  त्यासोबतच डिजिटल रायटिंग शिकविण्यासाठी विद्यार्थ्यांना ई-मेल, ब्लाॅग तसेच पोस्ट लिहिण्याबाबतही मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यासाठी शिक्षकांनी चांगले ब्लाॅग, ई-मेल, पोस्ट विद्यार्थ्यांना दाखवाव्यात, अशीही सूचना आराखड्यात आहे.

Web Title: School children's portfolio will be lighter next year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.