दहावीच्या निकालास उशीर झाल्यास शाळाच जबाबदार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 05:00 AM2021-07-01T05:00:00+5:302021-07-01T05:00:20+5:30

इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन करून त्यांच्या गुणांची माहिती बाेर्डाकडे ऑनलाईन भरण्यासाठी ३० जून २०२१ ही शेवटची मुदत देण्यात आली आहे. सद्यस्थितीत गडचिराेली जिल्ह्यातील जवळपास ९४ टक्के शाळांनी माहिती भरली आहे. उर्वरित ६ टक्के शाळांमधील विद्यार्थ्यांचा निकाल सध्या थंडबस्त्यात आहे.

The school is responsible if the result of class X is delayed! | दहावीच्या निकालास उशीर झाल्यास शाळाच जबाबदार !

दहावीच्या निकालास उशीर झाल्यास शाळाच जबाबदार !

googlenewsNext
ठळक मुद्देशाळांपुढे अडचणी : निकाल सादर करण्यासाठी शिक्षकांची धावपळ

लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : काेराेनामुळे दहावीची परीक्षा रद्द झाली तरी, विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाद्वारे विहित मर्यादेत गुणपत्रिका देणे आवश्यक आहे. त्यासाठी शिक्षण मंडळाने शाळांकडून ऑनलाईन माहिती मागविली आहे. ही माहिती ऑनलाईन पाठविण्यासाठी सध्या शाळा व शिक्षकांना धावपळ करावी लागत आहे. माहिती पाठविण्यास उशीर झाल्याने निकाल जाहीर होण्यास उशीर झाल्यास संबंधित शाळांना जाब विचारला जाणार आहे. 
इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन करून त्यांच्या गुणांची माहिती बाेर्डाकडे ऑनलाईन भरण्यासाठी ३० जून २०२१ ही शेवटची मुदत देण्यात आली आहे. सद्यस्थितीत गडचिराेली जिल्ह्यातील जवळपास ९४ टक्के शाळांनी माहिती भरली आहे. उर्वरित ६ टक्के शाळांमधील विद्यार्थ्यांचा निकाल सध्या थंडबस्त्यात आहे.
इयत्ता दहावीचा निकाल जाहीर व्हायचा असल्याने इयत्ता अकरावी व तत्सम वर्गाची प्रवेश प्रक्रिया थांबली आहे. आयटीआय, तंत्रनिकेतन व इतर अभ्यासक्रमाला कसे प्रवेश द्याचे हाही मुद्दा कायम आहे. मंत्रालय व सचिव स्तरावर याबाबत मंथन सुरू असून लवकरच निर्णय येणार आहे. सध्यास्थितीत इयत्ता दहावीचा निकाल जाहीर करण्यासाठी सर्वांची लगबग सुरू आहे. 

जिल्ह्यातील दहावीतील विद्यार्थी

सराव परीक्षेचे ३० गुण, इयत्ता नववीच्या निकालातील ५० गुण व ताेंडी परीक्षेचे २० अशा एकूण १०० गुणांनुसार आम्ही दहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन केले आहे. मला मूल्यमापन, गुणदान करून निकाल तयार करताना फारशी अडचण आली नाही. विहीत वेळेत आपण आमच्या शाळांचा निकाल सादर केला आहे. मूल्यमापन याेग्यरित्या केले असून काेणावरही अन्याय केला नाही. 
- गिरिश मुंजमकर, शिक्षक, चामाेर्शी

अडचणी फारशा नाहीत, परंतु १७ नंबरचा फॉर्म भरणारे विद्यार्थी, पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी यांच्याबाबत गुणांकन करताना तांत्रिक अडचणी निर्माण हाेत आहेत. या अडचणी आम्ही मंडळापर्यंत पाेहाेचविलेल्या आहेत. शाळेतील इतर विद्यार्थ्यांचा निकाल तयार केला आहे. दुर्गम भागात ऑनलाईनची समस्या असल्याने अडचणी आल्या. मात्र त्यावर मात केली.
- विलास मगरे, शिक्षक, जारावंडी

 

Web Title: The school is responsible if the result of class X is delayed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.