२२ हजार गुणवंत विद्यार्थ्यांच्या ‘मेरिट’ला शाळांचाच अडथळा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2023 11:52 AM2023-02-18T11:52:12+5:302023-02-18T11:52:32+5:30
शिष्यवृत्ती मिळाली, रक्कम मिळेना : बँक खाते लिहिण्यात कुचराई
अविनाश साबापुरे
यवतमाळ : वर्षभर प्रचंड मेहनत घेऊन हजारो मुले शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झाली. मेरीट लिस्टमध्येही आली. परंतु या गुणवंतांची त्यांच्याच शाळांना अजिबात कदर नसल्याने त्यांचा बँक खाते क्रमांक परीक्षा परिषदेला कळविण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे राज्यातील २२ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती थांबली आहे.
२०२२ च्या जुलै महिन्यात ही परीक्षा पार पडली. तर यंदा ३ जानेवारीला निकाल जाहीर झाला. त्यात २९ हजार १७१ विद्यार्थी शिष्यवृत्तीला पात्र ठरले. शिष्यवृत्तीची रक्कम मिळण्यासाठी त्यांचे बँक खाते क्रमांक परीक्षा परिषदेला कळविणे आवश्यक आहे. मात्र, महिना उलटून गेल्यानंतरही २९ केवळ सात हजार विद्यार्थ्यांचे खाते परिषदेला कळविण्यात आले.
इयत्ता ८ वीचे वंचित विद्यार्थी
रायगड २४८
ठाणे ३६१
पालघर १२९
पुणे ७३६
अहमदनगर ४५२
सोलापूर ४८०
नाशिक ५८७
धुळे २२८
जळगाव २९२
नंदुरबार १६१
कोल्हापूर ३७३
सातारा ३५१
सांगली ३०८
रत्नागिरी १८४
सिंधुदुर्ग १०५
औरंगाबाद ३७५
जालना १७०
बीड २८६
परभणी १३७
हिंगोली १००
अमरावती १८५
बुलडाणा २७१
अकोला १८७
वाशिम १२१
यवतमाळ १९५
नागपूर २८२
भंडारा १३४
गोंदिया १५४
वर्धा ६१
चंद्रपूर ११३
गडचिरोली ११
लातूर ३११
उस्मानाबाद १९३
नांदेड ३१९
मुंबई ९१५
इयत्ता ५ वीचे वंचित विद्यार्थी
रायगड २७९
ठाणे ५०२
पालघर २३८
पुणे ८४२
अहमदनगर ५८८
सोलापूर ५३७
नाशिक ५९७
धुळे २२१
जळगाव ४४५
नंदुरबार १८३
कोल्हापूर ४३८
सातारा ३५८
सांगली ३५३
रत्नागिरी १७४
सिंधुदुर्ग ९३
औरंगाबाद ४०३
जालना २१४
बीड ३३९
परभणी १८९
हिंगोली १३९
अमरावती ४६०
बुलडाणा ३३७
अकोला २७०
वाशिम १९१
यवतमाळ ३७७
नागपूर ६९६
भंडारा १७५
गोंदिया १९२
वर्धा १६१
चंद्रपूर ३१९
गडचिरोली १३०
लातूर ३३५
उस्मानाबाद २१८
नांदेड ३९०
मुंबई १२५०