उमरखेड येथे स्काऊट-गाईड मेळावा
By admin | Published: January 23, 2017 01:11 AM2017-01-23T01:11:42+5:302017-01-23T01:11:42+5:30
तंबाखूमुक्तीची घोषणा : १४ कब व १८ बुलबुल पथकांचा सहभाग
तंबाखूमुक्तीची घोषणा : १४ कब व १८ बुलबुल पथकांचा सहभाग
उमरखेड : तालुकास्तरीय भारत स्काऊट गाईडचा मेळावा येथील मनोहरराव नाईक फार्मसी महाविद्यालयाच्या प्रांगणात पार पडला. या मेळाव्यात १४ कब व १८ बुलबुल पथकांनी भाग घेतला होता. स्पर्धकांनी आपल्या सुप्त कलागुणांचे प्रदर्शन केले.
या मेळाव्याला प्रारंभ कब-बुलबुलच्या पथकाने जंगी आरोळी व बडी सलामी देऊन करण्यातआला. यावेळी उमरखेडचे गटशिक्षणाधिकारी पी.एम. दुधे, शालेय पोषण आहार अधीक्षक प्रमोद सोनटक्के, विस्तार अधिकारी पी.आर. खांडरे, मेळावा समन्वयक टी.एफ. यमजलवार, केंद्र प्रमुख संतोष घुगे, शंकर शिराळे, गणपत कुंबलवाड, मारोती ढगे, अ. रज्जाक, तंबाखु मुक्त शाळा अभियानाचे जिल्हा समन्वयक अवधूत वानखेडे, उत्तमराव दळवी, भारत कुळकर्णी, नारायण चव्हाण, गणेश कदम, राजू देशमुख, कृष्णराव पाचकोरे, पुष्पा चंद्रवंशी, सरोजना कर्णेवाड, प्राचार्य तिवारी, गिरीष देशमुख उपस्थित होते.
या मेळाव्यात कब विभागातून उमरखेड येथील साकळे विद्यालय प्रथम, नागापूर शाळाद्वितीय आणि बाळदी शाळेने तृतीय क्रमांक पटकाविला. बुलबुल विभागातून नागापूर शाळा प्रथम, चातारी येथील कन्या शाळा द्वितीय आणि सुकळीच्या शाळेने तृतीय क्रमांक पटकाविला. या मेळाव्यात साहसी खेळांचे प्रात्यक्षिक, कोपरा सजावट, हस्तकला, चित्रकला व विविध स्पर्धा घेण्यात आल्या. या मेळाव्यात तंबाखू मुक्तीची अनेकांनी घोषणा केली. चिल्ली येथील स्काऊट पथकाने नियोजनात मोलाची भूमिका पार पाडली. स्काऊट गाईडच्या या मेळाव्याने तालुक्यात उत्साह संचारला होता. समारोपीय कार्यक्रमाला पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)