भंगार बसेस रस्त्यावर

By admin | Published: June 2, 2014 01:50 AM2014-06-02T01:50:20+5:302014-06-02T01:50:20+5:30

राज्य परिवहन महामंडळाच्या पुसद आगारातील अध्र्या अधिक ...

Scratched buses on the streets | भंगार बसेस रस्त्यावर

भंगार बसेस रस्त्यावर

Next

राज्य परिवहन महामंडळाच्या पुसद आगारातील अध्र्या अधिक भंगार बसेस सर्रासपणे रस्त्यावर धावत आहेत. यापैकी अनेक बसेसला मोल्ड केलेले टायर बसविण्यात आले असून अनेक बसेसमधील आसने गायब आहेत. या भंगार अवस्थेतील बसेस ग्रामीण भागासह लांब पल्ल्यासाठीही वापरण्यात येतात. बसेसच्या दुर्दशेमुळे हजारो प्रवाशांचा जीव धोक्यात सापडला असून भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शहरासह ग्रामीण भागातील प्रवाशाना इच्छित स्थळी नेण्याची जबाबदारी एसटी महामंडळावर आहे. पुसद आगारातून ग्रामीण विभागासह अनेक लांब पल्ल्याच्या बसेस सोडण्यात येतात. सुरक्षित आणि सुखाचा प्रवास असल्यामुळे हजारो प्रवासी दररोज एसटी बसने प्रवास करतात. परंतु गेल्या काही दिवसांपासून या आगारातील अनेक बसेस भंगार झाल्या आहे. अनेक बसेस निकामी झाल्या आहेत. परंतु या बसेसला भंगारात न टाकता त्यामधून सर्रास प्रवाशांची वाहतूक केली जात आहे. तर अनेक बसेसमधील आसने गायब झाली आहेत. नादुरुस्त इंजिन, खिळखिळ्या झालेल्या खिडक्यामुळे या बसेस सतत आवाज करीत असतात. सध्या उन्हाळा असल्यामुळे आणि बसेसला मोल्ड टायर बसविण्यात आल्यामुळे अनेक बसेसच्या पंरचे प्रमाण वाढले आहे. बस पंर झाली म्हणजे प्रवाशांना हमखास घरी पोहोचण्यास एक ते दीड तास उशीर होतो. रबरी सीट नसल्यामुळे अनेक प्रवाशांना उभे राहून प्रवास करावा लागत आहे.

बहुजन हिताय बहुजन सुखायअसे ब्रीद घेऊन प्रवाशांच्या सेवेत उतरलेल्या एसटी महामंडळाच्या अनेक बसगाड्यांची सध्या मोठय़ा प्रमाणात दुरावस्था झाली आहे. अनेक वेळा रस्त्यात बस बंद पडून प्रवाशांचे हाल झाल्याचेही पाहावयास मिळतात. काही बस गाड्यांमधील आसन व्यवस्था पूर्णपणे कालबाह्य़ झाली असून अनेक गाड्यांच्या काचा गायब झालेल्या आहेत. गाड्यांचे पत्रेही फाटलेले असल्याने प्रवाशांना इच्छितस्थळी पोहोचपर्यंत वेगवेगळे आवाज ऐकून घ्यावे लागतात. लांब पल्ल्याच्या बसगाड्यांची पण अशी दुरावस्था कधी-कधी पाहावयास मिळते. तिकीट दरवाढ वरच्यावर वाढत असताना एसटी महामंडळ सुविधादेण्यात मात्र कुचराई करीत आहे, असा प्रवाश्यांचा आरोप आहे. त्याचप्रमाणे विशेष करुन भंगार बसेस ग्रामीण भागासाठी सोडण्यात येते. दुसरे कुठलेही साधन नसल्यामुळे प्रवाशांना आपला जीव धोक्यात घालून भंगार बसेसने प्रवास करावा लागत आहे. नादुरुस्ती इंजिनमुळे अनेक बसेस मधातच बंद पडत आहेत. बसेसच्या खस्ता हालतमुळे भविष्यात एखादी मोठी अनुचित घटना घडण्याची शक्यता आहे.

Web Title: Scratched buses on the streets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.