चार केबल व्यावसायिकांचे पॉर्इंट सील

By admin | Published: March 18, 2016 02:45 AM2016-03-18T02:45:22+5:302016-03-18T02:45:22+5:30

कमी केबल जोडण्या दाखवून लाखो रुपयांचा महसूल बुडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या शहरातील चार व्यावसायिकांवर

Seal of four cable professionals | चार केबल व्यावसायिकांचे पॉर्इंट सील

चार केबल व्यावसायिकांचे पॉर्इंट सील

Next

कोट्यवधीची थकबाकी : महसूल व पोलीस विभागाची संयुक्त कारवाई
यवतमाळ : कमी केबल जोडण्या दाखवून लाखो रुपयांचा महसूल बुडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या शहरातील चार व्यावसायिकांवर महसूल विभागाने गुरुवारी कारवाई करून अनधिकृत पॉइंट सील केले आहे.
यामध्ये एम.ए. रहमान यांच्याकडे ५८ लाख ६५ हजार रुपये, अनंता गावंडे यांच्याकडे ३६ लाख ६५ हजार रुपये, प्रवीण दाणी यांच्याकडे १८ लाख २६ हजार रुपये व निखिल इसासरे यांच्याकडे २२ लाख ६० हजार रुपये शासनाची थकबाकी आहे. त्यांना नोटीस पाठवूनही त्यांनी पैसे भारले नसल्याने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती महसूल विभागाकडून देण्यात आली. शासन परिपत्रकानुसार दोन दिवस विशेष मोहीम राबवून ही कारवाई करण्यात आली. यापुढेसुद्धा अशाप्रकारची कारवाई सुरूच राहणार असून अद्याप ज्या केबल व्यावसायिकांनी शासनाची थकबाकी भरली नाही. त्यांचाही क्रमांक निश्चितपणे लागणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच आजच्या कारवाईनंतरही या व्यावसायिकांनी पैसे न भरल्यास त्यांच्या स्थावर मालमत्तेवरही टाच येऊ शकते. भविष्यात त्यांची मालमत्ता जप्त होऊ शकते.
शासनाने सेटटॉप बॉक्स १ जानेवारी २०१६ पासून अनिवार्य केला होता. परंतु यामध्ये असलेल्या काही अडचणी लक्षात घेता ३१ मार्चपर्यंत सेट टॉप बॉक्सला मुदतवाढ देण्यात आली आहे. एकदा सेटटॉप बॉक्स अनिवार्य झाला तर मात्र करमणूक कर चोरीचे प्रकरणच संपुष्टात येईल.
सध्या क्रिकेटच्या २०-२० प्रकारातील वर्ल्ड कप २०१६ सुरू आहे. अशातच महसूल विभागाच्या या कारवाईने शहरातील अनेक भागातील टीव्ही संच बंद पडल. त्यामुळे ग्राहकांची चांगलीच गैरसोय झाली. क्रिकेटच्या अनेक चाहत्यांनी तर थेट तहसील कार्यालय गाठून याबाबतची माहिती घेतली. परंतु सत्य परिस्थिती त्यांच्यासमोर आल्यानंतर त्यांनीसुद्धा या कारवाईची प्रशंसाच केली.
तहसीलदार सचिन शेजाळ यांच्या मार्गदर्शनात नायब तहसीलदार बोरकर, करमणूक कर निरिक्षक गुल्हाने, देवरे यांनी या कारवाईत सहभाग नोंदविला. उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांनी बंदोबस्तही उपलब्ध करून दिला होता. यामध्ये सहाय्यक पोलीस निरिक्षक ताटे, पोलीस उपनिरिक्षक निर्मळ, मांढरे यांचा सहभाग होता. (प्रतिनिधी)

Web Title: Seal of four cable professionals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.