शाळेजवळील पानठेले सील करा

By admin | Published: June 4, 2016 02:16 AM2016-06-04T02:16:45+5:302016-06-04T02:17:24+5:30

शाळेतील मुलांना तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन जडू नये म्हणून शाळेजवळील पानठेले सील करावे, त्यासाठी मुख्याध्यापक आणि ग्रामपंचायतीने पुढाकार घ्यावा,

Seal the leaflet alongside the school | शाळेजवळील पानठेले सील करा

शाळेजवळील पानठेले सील करा

Next

जिल्हाधिकारी : जिल्हा परिषद परिसरात तंबाखूविरोधी भित्तीचित्र स्पर्धेचा अनावरण सोहळा
यवतमाळ : शाळेतील मुलांना तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन जडू नये म्हणून शाळेजवळील पानठेले सील करावे, त्यासाठी मुख्याध्यापक आणि ग्रामपंचायतीने पुढाकार घ्यावा, शाळेच्या परिपाठात तंबाखूविरोधी संदेश आणि शपथ देण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी केल्या.
जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिनानिमित्त जिल्हा परिषद, सलाम मुंबई फाऊंडेशनतर्फे भित्तीचित्र स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या चित्रांच्या अनावरण सोहळ्यात जिल्हाधिकारी बोलत होते. जिल्हा परिषद सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. आरती फुपाटे, सीईओ दीपक सिंगला, पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंग, मुख्याधिकारी सुदाम धुपे, शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर, शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी आदी उपस्थित होते. जिल्हा परिषद इमारत, लक्ष्मणराव कळसपुरकर, आयुर्वेदिक महाविद्यालय आणि मातोश्री रमाबाई आंबेडकर नगरपरिषद आयुर्वेदिक रुग्णालय पाटीपुरा याठिकाणी अनेक विद्यार्थ्यांनी तंबाखूविरोधी चित्रे रेखाटली. स्पर्धक विद्यार्थी आणि कला अध्यापक संघ यांना सहभाग घेतल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देण्यात आले. यावेळी उपस्थितांना तंबाखूमुक्तीची शपथ देण्यात आली. जिल्ह्यातील सर्व संस्था, संघटनांनी एकत्र येऊन जिल्हा तंबाखूमुक्त करावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंग यांनी केले.
२१ व्या शतकातील मुलांनी चाणाक्षपणे निर्णय घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. आरती फुपाटे यांनी केले. महिला सरपंच, जिल्हा परिषद सदस्य यांच्यामध्ये तंबाखूविरोधी जनआंदोलन पोहोचविण्याचा मानसही त्यांनी बोलून दाखविला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तंबाखूमुक्त शाळा उपक्रमाचे जिल्हा समन्वयक चंद्रबोधी घायवटे यांनी केले. प्रास्ताविक डॉ. चेतन दरणे यांनी केले. सलाम मुंबई फाऊंडेशनचे अजय पिळणकर यांनी आभार मानले. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Seal the leaflet alongside the school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.