नगराध्यक्षांच्या अनधिकृत बांधकामांवर शिक्कामोर्तब

By admin | Published: March 20, 2016 02:14 AM2016-03-20T02:14:31+5:302016-03-20T02:14:31+5:30

यवतमाळचे नगराध्यक्ष सुभाष राय यांना घराच्या अतिक्रमणातून जिल्हाधिकाऱ्यांनी क्लिनचिट दिली आहे.

Seal of unauthorized construction of the Chief of the Town | नगराध्यक्षांच्या अनधिकृत बांधकामांवर शिक्कामोर्तब

नगराध्यक्षांच्या अनधिकृत बांधकामांवर शिक्कामोर्तब

Next

जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय : नगरपरिषदेला कारवाईचे आदेश
यवतमाळ : यवतमाळचे नगराध्यक्ष सुभाष राय यांना घराच्या अतिक्रमणातून जिल्हाधिकाऱ्यांनी क्लिनचिट दिली आहे. परंतु त्यांच्या घराचे सुमारे चार हजार चौरस फुटाचे बांधकाम हे परवान्यापेक्षा अधिक अर्थात अनधिकृत ठरविण्यात आले आहे. सदर अनधिकृत बांधकामाबाबत यवतमाळ नगर परिषदेला तातडीने कारवाईचे निर्देश देण्यात आले आहे.
नगराध्यक्ष सुभाष राय यांनी बालाजी चौक येथे घरबांधकाम करताना कोणतीच परवानगी घेतली नाही. त्यामुळे त्यांना नगराध्यक्ष पदावरून त्वरित खारीज करावे, अशी तक्रार नीलेश श्यामसुंदर शर्मा (रा. बुलडाणा) या व्यक्तीने केली होती. या तक्रारीनंतर रॉय यांच्या संपूर्ण बांधकामाची नगरपरिषद व नगररचना विभागाकडून चौकशी करण्यात आली. यामध्ये राय यांनी प्लॉट क्रमांक ५६ मध्ये ३८५.८० चौरस मीटर इतक्या बांधकामाची परवानगी असताना प्रत्यक्षात ५९४.९७ चौरस मीटर बांधकाम केल्याचे आढळून आले. याप्रमाणेच प्लॉट क्रमांक १४९/३ यावर २९०.४५ चौरस मीटर बांधकाम करण्याची परवानगी असताना प्रत्यक्षात ४९६.९२ चौरस मीटर बांधकाम केल्याचे उपविभागीय अधिकाऱ्यांनी पाठविलेल्या अहवालात नमूद केले. त्यामुळे राय यांनी कोणत्याही जागेवर अतिक्रमण केले नसून मालकीच्या जागेत परवानगीपेक्षा अधिक बांधकाम केल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. जास्त बांधकामाबाबत नगरपरिषदेने कार्यवाही करण्याची सूचना केली आहे. सुभाष राय यांचे नगराध्यक्षपद खारीज करण्याबाबत तक्रारदाराने केलेला अर्ज हा महाराष्ट्र नगरपरिषद , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ च्या कलमान्वये दाखल केला नाही, केवळ साधा तक्रार अर्ज केला आहे. त्यामुळे ही तक्रार खारिज केली आहे. अनेक दिवसांपासून शहर वासियांचे लक्ष लागून असलेल्या या प्रकरणाचा अखेर निकाल लागला आहे. शिवाय राजकीय दृष्टिकोनातून झालेल्या या तक्रारीचे इप्सीत साध्य झाले की नाही, यावर सर्वत्र चर्चा रंगत आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयावर नगराध्यक्ष सुभाष राय यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Seal of unauthorized construction of the Chief of the Town

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.