नरभक्षक वाघिणीची हत्तीवरून शोधमोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 10:13 PM2018-02-07T22:13:13+5:302018-02-07T22:13:30+5:30

तब्बल दहा बळी घेणाºया नरभक्षक वाघिणीचा आता हत्तीवरून शोध घेतला जात आहे. मुंबईतील वन्यजीवप्रेमीने वाघिणीला मारण्यास विरोध दर्शविल्याने वाघिणीला ठार करण्याचे आदेश मागे घेण्यात आले आहे.

Search by elephant on cannibals | नरभक्षक वाघिणीची हत्तीवरून शोधमोहीम

नरभक्षक वाघिणीची हत्तीवरून शोधमोहीम

Next
ठळक मुद्देदहा बळी : वन्यजीवप्रेमींचा वाघिणीला मारण्यास विरोध, माणसांचा जीव मात्र धोक्यातच

लोकमत न्यूज नेटवर्क
राळेगाव/मोहदा : तब्बल दहा बळी घेणाºया नरभक्षक वाघिणीचा आता हत्तीवरून शोध घेतला जात आहे. मुंबईतील वन्यजीवप्रेमीने वाघिणीला मारण्यास विरोध दर्शविल्याने वाघिणीला ठार करण्याचे आदेश मागे घेण्यात आले आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून राळेगाव तालुक्यात नरभक्षक वाघिणीने धुमाकूळ घालत तब्बल दहा बळी घेतले. त्यामुळे परिसरातील शेतकरी व नागरिक वाघिणीचा बंदोबस्त करण्याची मागणी करीत आहे. त्यावरून या वाघिणीला मारण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र मुंबईतील डॉ.सरिता सुब्रमण्यम यांनी एनटीसीएकडे तक्रार केली. त्यावरून वाघीण मारण्याच्या आदेशाला स्थगिती देण्यात आली. यामुळे माणसांचा जीव मात्र धोक्यात सापडला आहे. आता हत्तीवरून या नरभक्षक वाघिणीचा शोध घेतला जात आहे.
ताडोबा येथील हत्तीवरून या परिसरात वाघिणीचा शोध सुरू आहे. मात्र अद्याप वन विभागाच्या पथकाला वाघीण आढळली नाही. डॉ.चेतन, डॉ.कडू, वाघिणीला बेशुद्ध करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. तथापि या परिसरात नरभक्षक वाघिणीसह आणखी किती वाघ आहे, या प्रश्नाचे उत्तर वनविभागाकडे नाही. दोन वर्षापूर्वी एक वाघीण तिच्या पिलासह याच परिसरात फिरताना आढळली होती. गेल्या दीड वर्षापासून वन विभागाने वाघ पकडण्याची मोहीम एककल्ली पद्धतीने राबविल्याने यश आले नाही.
ताडोबातील गणराज सराटी जंगलात दाखल
नरभक्षक वाघिणीच्या शोधासाठी ताडोबातील मोहर्ली गेटमधील गणराज सराटी व लोणी जंगल परिसरात दाखल झाले आहे. माहूत आत्राम यांच्या नेतृत्वात वाघिणीचा शोध सुरू आहे. दररोज दोन टप्प्यात जंगलात गस्त सुरू आहे. मात्र दररोज वन कर्मचारी रिकाम्या हाताने परतत आहे. हत्तींची संख्या वाढविण्यासाठी वन विभाग प्रयत्नरत आहे. यापूर्वी याच गणराजाने चंद्रपुरातील नरभक्षक वाघिणीला बेशुद्ध करण्यात मोलाची भूमिका बजावली होती.

Read in English

Web Title: Search by elephant on cannibals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.