‘जोश’च्या दुसऱ्या दिवशी कलागुणांची उधळण

By Admin | Published: January 9, 2017 02:04 AM2017-01-09T02:04:08+5:302017-01-09T02:04:08+5:30

लोकमत-समाचार-टाइम्स सखी मंचच्यावतीने आयोजित ‘जोश’च्या दुसऱ्या दिवशी कलागुणांची धूम होती.

On the second day of 'Josh', the art of excellence | ‘जोश’च्या दुसऱ्या दिवशी कलागुणांची उधळण

‘जोश’च्या दुसऱ्या दिवशी कलागुणांची उधळण

googlenewsNext

सखी मंच : भाषण स्पर्धेलाही उत्स्फूर्त प्रतिसाद, जुडा सजाओ, ड्राय फ्लॉवर अरेंजमेंट स्पर्धा
यवतमाळ : लोकमत-समाचार-टाइम्स सखी मंचच्यावतीने आयोजित ‘जोश’च्या दुसऱ्या दिवशी कलागुणांची धूम होती. स्पर्धेत सहभागी सखींनी विविध वस्तूंपासून तयार केलेल्या वस्तू लक्षवेधी ठरल्या. एवढेच नव्हे तर ‘जोश’च्या व्यासपीठावरून सखींनी आपल्यातील वक्तृत्व गुणही सिद्ध केले. शुक्रवारी येथील दर्डा मातोश्री सभागृहात विविध स्पर्धा पार पडल्या.
ड्राय फ्लॉवर अरेंजमेंट स्पर्धेत फुला-पानांची रंगसंगती, निट नेटकेपणा याबाबी जपत सखींनी क्रमांक प्राप्त केले. या स्पर्धेत प्रथम क्रमांक दीपा तम्मेवार, द्वितीय कविता लढ्ढा तर तृतीय क्रमांक राखी खत्री यांनी प्राप्त केला. परीक्षक म्हणून डॉ. सारिका शाह, अलका राऊत यांनी काम पाहिले. त्यांचे स्वागत सखी मंचचे स्मृती चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन स्वाती अनसुरकर, वर्षा नेवारे यांनी केले.
जुडा सजावो स्पर्धेत सखींनी नावीन्यपूर्णत: सिद्ध केली. उत्कृष्ट जुडा सजवून क्रमांक प्राप्त केला. वृषाली धूत, राखी खत्री, स्मीता टोचर यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक प्राप्त केला. या स्पर्धेच्या परीक्षक म्हणून धारीनी शाह यांंनी काम पाहिले. संगीता मुदकोंडावार यांनी त्यांचे सखी मंचचे स्मृती चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
टाकावू पत्रिकेपासून ग्रिटींग कार्ड तयार करण्याची स्पर्धा घेण्यात आली. सखींनी तयार केलेले ग्रिटींग त्यांच्या कलेला दाद देणारे ठरले. या स्पर्धेत प्रथम क्रमांक जयश्री तळणकर, द्वितीय कांचन निंबेकर तर तृतीय क्रमांक कविता लढ्ढा यांनी प्राप्त केला. परीक्षक म्हणून अलका मुंधडा व छाया राठी यांनी काम पाहिले. त्यांचे स्वागत मीना माहेश्वरी व रचना शेंडे यांनी सखी मंचचे स्मृती चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन केले.
रुप-कुरुप (आवडती-नावडती) या स्पर्धेत माला टाके व स्मीता गंधे यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला. द्वितीय क्रमांकाच्या मानकरी राखी खत्री व शुभांगी भालेराव या ठरल्या. या स्पर्धेच्या परीक्षक म्हणून नलिनी हांडे यांनी जबाबदारी पार पाडली. त्यांचे स्वागत सुनंदा राजगुरे यांनी सखी मंचचे स्मृती चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन केले.
हौजी अंतर्गत रंगारंग गेम खेळविण्यात आले. यामध्ये प्रथम क्रमांक मीना मैसेरी, द्वितीय संगीता मुदकोंडावार तर तृतीय क्रमांक नलिनी हांडे यांनी प्राप्त केला. रंगारंग गेम-२ मध्ये रचना शेंडे व संगीता मुदकोंडावार विजयी ठरल्या.
भाषण स्पर्धेसाठी मोबाईलचे फायदे-तोटे हा विषय ठेवण्यात आला होता. यामध्ये स्पर्धकांनी विषयाला अनुसरुन आपली मते मांडली. ‘जोश’च्या माध्यमातून सखींना आपल्यातील सभाधीटपणा आणि भाषण कौशल्य सिद्ध करता आले. या स्पर्धेत छाया राठी प्रथम तर स्मीता गंधे द्वितीय आल्या. या स्पर्धेच्या परीक्षक म्हणून डॉ. सारिका शाह यांनी काम पाहिले. सुनंदा राजगुरे यांनी त्यांचे स्वागत सखी मंचचे स्मृती चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन केले.
या कार्यक्रमांचे संचालन छाया राठी यांनी केले. विविध स्पर्धातील विजेत्या सखींना लोकमत सखी मंचच्या जिल्हा प्रमुख सीमा दर्डा यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. (उपक्रम प्रतिनिधी)

सखी मंच सदस्य नोंदणी
४लोकमत सखी मंचच्या सदस्य नोंदणी मोहिमेला सुरुवात झाली आहे. ५०० रुपये शुल्क भरुन सखींना सदस्य होता येणार आहे. सदस्य होणाऱ्या सखींना अंजली कंपनीचे फ्रायपॅन गिफ्ट दिले जाणार आहे. नोंदणीसाठी लोकमत सखी मंचच्या जिल्हा प्रमुख सीमा दर्डा, दर्डानगर, लोकमत जिल्हा कार्यालय गांधी चौक यवतमाळ (०७२३२-२४८११९), सुषमा गणात्रा, आर्णी रोड (८०८७२३८४८७), शारदा गांधी, धामणगाव रोड (९९२३३३३६२०), अलका राऊत, जलाराम बाप्पा मंदिराजवळ, श्रीकृष्णनगर (९९२२६६१४८७), छाया राठोड, अंजनेय सोसायटी (७५०७६३०१७०), छाया राठी, आशुतोष अपार्टमेंट, सत्यनारायण ले-आऊट (९४२०६२२७९९) यांच्याशी संपर्क साधावा.

Web Title: On the second day of 'Josh', the art of excellence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.