दुसरा गणवेशही लवकरच मिळणार...! स्काउट गाईडचा ड्रेस देणार, तालुक्यांना पैसे वितरित 

By अविनाश साबापुरे | Published: July 18, 2023 06:43 PM2023-07-18T18:43:15+5:302023-07-18T18:43:27+5:30

शाळा सुरू होऊन दोन आठवडे लोटल्यानंतर आता दुसऱ्या मोफत गणवेशाचे पैसे शाळांना देण्यात आले आहेत.

Second uniform will be available soon Scout guide's dress will be given, money will be distributed to the talukas | दुसरा गणवेशही लवकरच मिळणार...! स्काउट गाईडचा ड्रेस देणार, तालुक्यांना पैसे वितरित 

दुसरा गणवेशही लवकरच मिळणार...! स्काउट गाईडचा ड्रेस देणार, तालुक्यांना पैसे वितरित 

googlenewsNext

यवतमाळ: शाळा सुरू होऊन दोन आठवडे लोटल्यानंतर आता दुसऱ्या मोफत गणवेशाचे पैसे शाळांना देण्यात आले आहेत. जवळपास पावणे पाच कोटी रुपये शाळांना वितरीत करण्यात आले असून त्यातून आता विद्यार्थ्यांना स्काउट गाईडचा ड्रेस खरेदी करून द्यावा लागणार आहे.

दरवर्षी समग्र शिक्षा अभियानातून दोन मोफत गणवेश विद्यार्थ्यांना दिले जातात. यंदा एका गणवेशाचे पैसे जून महिन्यातच वितरीत करण्यात आले होते. तर दुसरा गणवेश मात्र राज्य शासनाच्या स्तरावरून दिला जाणार अशी सूचना करण्यात आल्याने अर्धा निधी थांबवून ठेवण्यात आला होता. परंतु, आता तोही निधी वितरित करण्यात आला आहे. त्यासाठी जिल्ह्यातील शाळांना एकंदर चार कोटी ७३ लाख ८७ हजार ४०० रुपये देण्यात आले आहेत. यातून शाळा व्यवस्थापन समित्यांनी गणवेश खरेदी करायची आहे. राज्य शासनाच्या निर्देशानुसार या पैशातून विद्यार्थ्यांना स्कउट गाईडचा ड्रेस द्यायचा आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना आकाशी रंगाचा शर्ट व गडद निळ्या रंगाची पँट दिली जाणार आहे. तसेच विद्यार्थिनींना आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाचा स्कर्ट दिला जाणार आहे. शिवाय, ज्या शाळांमध्ये मुलींसाठी सलवार कमीज हा गणवेश वापरला जातो, तेथे तशा प्रकारचाच पण ठरवून दिलेल्या रंगाचा गणवेश दिला जाणार आहे. 

किती आहेत गणवेशाचे लाभार्थी?

  • मुली : ९३,९७५
  • एससी मुले : १०,७९१
  • एसटी मुले : २१,४३० 
  • बीपीएल मुले : ३१,७६२ 
  • एकूण : १,५७,९५८ 

कोणत्या तालुक्याला किती पैसे 

  • आर्णी : ३०१९८००
  • बाभूळगाव : १७४०३००
  • दारव्हा : ३६७३५००
  • दिग्रस : २२८६३००
  • घाटंजी : ३३२२२००
  • कळंब : १८९५७००
  • महागाव : ४४२४१००
  • मारेगाव : १३४२२००
  • नेर : १८९४२००
  • पांढरकवडा : २७५८८००
  • पुसद : ५७३४८००
  • राळेगाव : १८६७२००
  • उमरखेड : ५५४६४००
  • वणी : २१७८६००
  • यवतमाळ : ३९८०१००
  • झरी : १७२३२०० 
     

Web Title: Second uniform will be available soon Scout guide's dress will be given, money will be distributed to the talukas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.