माध्यमिक शाळेतील विज्ञान शिक्षकांचा पगडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2019 06:00 AM2019-09-05T06:00:00+5:302019-09-05T06:00:12+5:30

यवतमाळ : वडील इंडियन रेल्वेत ट्रॅफिक पोलीसमध्ये कार्यरत होते. अगदी निवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना त्यांना डीवायएसपी म्हणून पदोन्नती मिळाली. मुलाने ...

Secondary school science teacher's turban | माध्यमिक शाळेतील विज्ञान शिक्षकांचा पगडा

माध्यमिक शाळेतील विज्ञान शिक्षकांचा पगडा

googlenewsNext
ठळक मुद्देइंजिनिअर ते जिल्हा पोलीस अधीक्षक पदापर्यंतच्या प्रवासात वडील व विज्ञान शिक्षकाच्या मार्गदर्शनाचा ठसा

यवतमाळ : वडील इंडियन रेल्वेत ट्रॅफिक पोलीसमध्ये कार्यरत होते. अगदी निवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना त्यांना डीवायएसपी म्हणून पदोन्नती मिळाली. मुलाने नोकरीची सुरुवातच अव्वल दर्जाच्या पदावरून करावी असा त्यांचा मानस होता. मद्रास ख्रिस्तीयाना माध्यमिक विद्यालयात असताना विज्ञान शिक्षक पी.विश्वनाथन यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. आजही मित्रात बसलो की पी.व्ही. सरांची आठवण हमखास निघते. एसपी झाल्यानंतर त्यांची भेट घेण्याचा अनेकदा प्रयत्न केला. अद्यापपर्यंत यात यश आलेले नाही. त्यानंतर यूपीएससीच्या तयारीकरिता गणेश सुब्रमण्यम यांचे मार्गदर्शन लाभल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी सांगितले.

वडिलांच्या कामाची पद्धत हीच माझी प्रेरणा
विज्ञान शिक्षक आवडते असल्याने साहजिकच विज्ञान विषयात रुची निर्माण झाली. पी. विश्वनाथ सर अतिशय सोप्या पद्धतीने शिकवून सिलॅबस वेळेत पूर्ण करीत होते. तर यूपीएससीची तयारी करण्यासाठी दाखल झालेल्या अ‍ॅकेडमीतील शिक्षक गणेश सुब्रमण्यम यांनी त्यांच्या वाट्याला आलेले यूपीएससीतील अपयश यातूनच विद्यार्थ्यांकरिता यशाचा मार्ग तयार केला. वडिलांचे दैनंदिन जीवन एक प्रेरणादायी वाट होती. त्यांची स्वत:हून काम करण्याची व त्यातून इतरांना कामासाठी प्रोत्साहित करण्याची कला आजही स्मरणात आहे. किंबहुना त्याचाच अवलंब करून माझी वाटचाल सुरू आहे. आज शिक्षकदिनी त्यांना वंदन...!

वडिलांनीच दिला करिअर निवडण्याचा चॉईस..
इलेक्ट्रीक्लस अ‍ॅन्ड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यानंतर चांगल्या मल्टीनॅशनल कंपनीत जॉबही मिळाला होता. मात्र तेथे मन लागत नव्हते. तेव्हा वडिलांकडे शिक्षणासाठी दोन वर्षे मागितली. यावर वडिलांनी ‘तुझ्या मुलाने तुला असा प्रश्न केला असता तर तू काय निर्णय घेतला असता?’ असा प्रतिप्रश्न केला व दोन वर्षे यूपीएससीच्या तयारीची परवानगी दिली. वडिलांचे दैनंदिन जीवन हेचमाझ्यासाठी गुरुकिल्ली होते. रेल्वेत नोकरीला असतानाही सहकाऱ्यांना घेऊन ते काम करीत होते. आपल्या अधिनस्त असलेल्या कनिष्ठांचाही आदर करण्याचा गुण त्यांच्याकडून मिळाला. कोणते काम करून घेताना रट्टा मारण्याऐवजी समोरच्यांना प्रोत्साहित केल्यास त्या कामाचा आनंद करणाऱ्याला व करून घेणाऱ्याला मिळतो. यातून एक स्वयंस्फूर्तीने काम करणारी टीम तयार करता येते. वडील मेघनाथ यांनी शिकविण्यापेक्षा कृतीचा आदर्श ठेवून मला घडविले. हाच मार्ग प्रशासकीय अधिकारी म्हणून मी कामात अवलंबितो.

गुरुचे अपयश ठरले ‘सक्सेस की’...
सिव्हील सर्व्हिस कोचिंग क्लासेस चालविणारे शिक्षक गणेश सुब्रमण्यम यांचे अपयश आमच्यासाठी ‘सक्सेस की’ ठरली. त्यांच्या अ‍ॅकेडमीत प्रवेश घेताच त्यांनी कोणत्या चुका करायच्या नाही हे परिमाण स्वत:च्या अनुभवातून तयार केले. त्याच चुकांना टाळत मी यूपीएससीची तयारी केली व दोन वर्षानंतर आत्मविश्वासाने आयपीएस म्हणून सेवेत आलो.

Web Title: Secondary school science teacher's turban

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.