दारुबंदीसाठी आमदारांना घेराव

By admin | Published: June 4, 2016 02:12 AM2016-06-04T02:12:05+5:302016-06-04T02:12:05+5:30

यवतमाळ जिल्ह्यात दारुबंदी करण्याचे आश्वासन अनेक लोकप्रतिनिधींकडून देण्यात आले.

Secretion of MLAs for prohibition | दारुबंदीसाठी आमदारांना घेराव

दारुबंदीसाठी आमदारांना घेराव

Next

कळंबमध्ये रोष : महिलांनी मांडली कैफियत, ठाणेदारांना सूचना
कळंब : यवतमाळ जिल्ह्यात दारुबंदी करण्याचे आश्वासन अनेक लोकप्रतिनिधींकडून देण्यात आले. यामध्ये आमदार डॉ.अशोक उईके यांचाही समावेश होता. परंतु अजूनही दारुबंदीसाठी ठोस पावले उचलली गेली नाही. आमदार डॉ.उईके यांना शुक्रवारी स्वामिनी समितीच्या सदस्यांनी येथे घेराव करून जाब विचारला.
आमदार डॉ.उईके यांनी हिवाळी अधिवेशात दारुबंदीसाठी निघालेल्या मोर्चाप्रसंगी उपस्थित राहून समर्थन दिले होते. यावेळी अनेक महिलांनी आमदार डॉ.उईके यांच्यासमोर येत आपली कैफीयत मांडली. कोणत्या गावात दारु सुरु आहे, पोलीस दारुवाल्यांकडून कसे पैसे घेतात, त्यामुळे अवैध दारु विक्रेत्यांची गावात कशी दादागिरी वाढली आहे, दारुमुळे कुटुंबाची कशी वाताहत झाली, याची माहितीही यावेळी महिलांनी दिली.
मोर्चाचे नेतृत्व महेश पवार व मनीषा काटे यांनी केले. सागर मून, अशोक उमरतकर, सुषमा गाढवे, नामदेव टेकाम, भारती गोल्हर, शोभा गावंडे, पुष्पा कठाडे, आशा कोमटी, संजीवनी कासार, सुनीता रायमल, सुनीता तिवस्कर, अनिता गावंडे, चंदा कंकाले, नंदा वाडेकर, राजश्री मोहुर्ले, अलका मेश्राम, मंगला चुनारकर, वर्षा कुटे, मंदा धरणेकर, मालती डेरे, ज्योती गांवडे, सुनीता मोहुर्ले, मोहिनी पांडे, साधना लोणबळे, दीपा अजमिरे, संजय मोरे, मंदा उमरे, उषा मडावी, सुनीता राहुलकर, माया पोहाणे आदी महिला घेराव आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. दरम्यान, आमदार डॉ.उईके यांनी ठाणेदार बी.जी. कऱ्हाळे यांना तत्काळ पाचारण केले. महिला काय म्हणतात, हे ऐकावयास सांगितले. त्यानंतर ठाणेदारांना विश्राम भवन येथे बोलावून गावातील अवैध दारु तत्काळ बंद करण्याचे आदेश दिले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Secretion of MLAs for prohibition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.