आंतरराष्ट्रीय शिबिराला सहा देशातील साधक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2020 06:00 AM2020-02-07T06:00:00+5:302020-02-07T06:00:07+5:30

भिक्खुनी खंतीखेमा यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले, जगामध्ये माझा आयडॉल हिरो म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर होय. पहिल्यांदा विज्ञानावर आधारित आपला धम्म सांगणारा महामानव बुद्ध होय. नंतर जगाला १९ शतकानंतर विज्ञानावर आधारित बुद्ध धम्म स्वीकारून जगामध्ये सांगणारा, पसरविणारा दुसरा महामानव बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर होय.

Seekers from six countries to international camps | आंतरराष्ट्रीय शिबिराला सहा देशातील साधक

आंतरराष्ट्रीय शिबिराला सहा देशातील साधक

Next
ठळक मुद्देजेतवन येथे आयोजन : अमेरिकेतील भन्ते महाथेरो विमलरासी उद्घाटक

लोकमत न्यूज नेटवर्क
हिवरी : आर्णी मार्गावरील जेतवन पर्यटन स्थळ येथे आंतरराष्ट्रीय ध्यान शिबिर आयोजित केले आहे. १ फेब्रुवारीला या शिबिराचे उद्घाटन अमेरिकेतील भन्ते महाथेरो विमलरामसी यांच्या हस्ते करण्यात आले. या ध्यान शिबिरामध्ये अमेरिका, जर्मनी, कॅनडा, इंग्लंड, आॅस्ट्रेलिया, नेदरलँड अशा विविध देशातील साधकांनी सहभाग घेतला आहे. ११ फेब्रुवारीपर्यंत हे शिबिर चालणार आहे.
भिक्खुनी खंतीखेमा यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले, जगामध्ये माझा आयडॉल हिरो म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर होय. पहिल्यांदा विज्ञानावर आधारित आपला धम्म सांगणारा महामानव बुद्ध होय. नंतर जगाला १९ शतकानंतर विज्ञानावर आधारित बुद्ध धम्म स्वीकारून जगामध्ये सांगणारा, पसरविणारा दुसरा महामानव बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर होय. मी स्वत:ला भाग्यवान समजते. येथील ध्यान शिबिराच्या माध्यमातून बुद्ध धम्माचा प्रचार व प्रसार करता आला. आज माणसाचा मेंदू नियंत्रित राहिलेला नाही. त्यामुळे मानव यंत्रमानव बनला आहे. आपला स्वत:चा मेंदू शरीरासोबत भांडत आहे. मेंदूवर नियंत्रण ठेवायचे असेल तर बुद्धांची ध्यान साधना, विपश्यना याशिवाय दुसरा पर्याय नाही. चांगला मानव घडविण्याची किमया फक्त बौद्ध ध्यान साधनेत असल्याचे त्यांनी सांगितले.
या शिबिरात श्रीलंकेचे भन्ते धम्मगावेसी, युरोपचे भन्ते उपेका, औरंगाबादचे भन्ते डॉ. आनंद मार्गदर्शन करीत आहेत. या शिबिराचे आयोजन रमेश बन्सोड यांनी केले असून महेंद्र मानकर, अनिल बन्सोड, मंगला मुनेश्वर, जयेश कांबळे, आशीष बन्सोड, ओशो बन्सोड, सुनील बन्सोड, सुरज बन्सोड, शशांक बन्सोड, स्वागत बन्सोड, चिंतामण फुलमाळी परिश्रम घेत आहेत. शिबिराला विदेशातून आलेले साधक, शास्त्रज्ञ, डॉक्टर, वकील, लेखक, इंजिनिअर, तत्त्वज्ञ आहेत. भारताच्या विविध राज्यातील विद्वान, विविध समाजातील साधकांनी शिबिरात भाग घेतला आहे. काहींनी श्रामणेर दीक्षा देखील घेतली आहे.

बुद्धांची सोप्या भाषेत दहा दिवस विपश्यना
मानव हा जगामध्ये भटकलेला आहे. त्याचा स्वत:वर व आपल्या मेंदूवर विश्वास नाही. अशा स्थितीतून मानवाला बाहेर काढण्यासाठी बुद्धांनी सोप्या भाषेतील विपश्यना सांगितल्या आहे. दहा दिवस ही विपश्यना केल्यास जगाला व आपल्या कुटुंबाला, समाजाला चांगला माणूस देऊ शकतो, असे भिक्खुनी खंतीखेमा यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणात सांगितले.

Web Title: Seekers from six countries to international camps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.