‘जेडीआयईटी’च्या विद्यार्थिनीची नामांकित कंपनीत निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 11:37 PM2018-03-30T23:37:54+5:302018-03-30T23:37:54+5:30
येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागातील अंतिम वर्षाची विद्यार्थिनी प्रणोती म्हैस्कर हिची मुंबई येथील ईशानी एम्ब्राडरिज या नामांकित कंपनीत निवड झाली आहे.
ऑनलाईन लोकमत
यवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागातील अंतिम वर्षाची विद्यार्थिनी प्रणोती म्हैस्कर हिची मुंबई येथील ईशानी एम्ब्राडरिज या नामांकित कंपनीत निवड झाली आहे. महाविद्यालयात घेण्यात आलेल्या कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे मर्चडायझर या पदासाठी तिची निवड करण्यात आली. कंपनीने तिला १.८० लाख रुपये वार्षिक पॅकेज जाहीर केले आहे.
कंपनी आणि मार्केटमधील दुवा म्हणून मर्चडायझर जबाबदारी सांभाळते. ईशानी एम्ब्राडरिजचे कार्य देश-विदेशात आहे. आॅर्डर घेऊन डिझाईन करणे आणि ती पूर्ण करून देणे हे मर्चडायझरचे काम असते. प्रणोतीला देश-विदेशातील विविध कंपन्यांसोबत काम करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. इंटरव्ह्यू घेणाऱ्या चमूमध्ये ईशानी एम्ब्राडरिज मुंबईचे डायरेक्टर समीर लखलाणी, प्रदीप घारे आदींचा समावेश होता.