महाराष्ट्र केसरी स्पर्धेकरिता पुसदच्या कुस्तीगिरांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 05:24 AM2021-02-28T05:24:04+5:302021-02-28T05:24:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुसद : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अधिवेशन पुणे येथे होत आहे. त्याकरिता तालुक्यातील कुस्तीगिरांची निवड स्पर्धेद्वारा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अधिवेशन पुणे येथे होत आहे. त्याकरिता तालुक्यातील कुस्तीगिरांची निवड स्पर्धेद्वारा येथील हनुमान आखाड्यात करण्यात आली.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कुस्तीगीर परिषदेचे विभागीय सचिव अनिल पांडे, जिल्हा कुस्तीगीर संघाचे उद्धव बाकडे, पालिकेचे पाणीपुरवठा सभापती ॲड. उमाकांत पापिनवार उपस्थित होते. अनिल पांडे यांचा हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष घनश्याम दुधे यांनी सत्कार केला तर उमाकांत पापिनवार यांचा सत्कार सहसचिव दीपक जाधव, उद्धव बाकडे यांचा सत्कार शामराव जाधव यांनी केला.
प्रास्ताविक मंडळाचे कोषाध्यक्ष शरद बजाज यांनी केले. या निवड स्पर्धेतून निवडलेल्या कुस्तीगिरांची नावे पुढीलप्रमाणे - ५७ किलो - यश राठोड, निरंजन जाधव, ६१ किलो - प्रकाश बोके, विनायक चव्हाण, ६५ किलो - नितीन चव्हाण, पंकज हिवाले, ७० किलो - विकास शिंदे, भाऊ डंगोरिया, ७४ किलो - आकाश दिंडे, शेख सलीम, ७९ किलो - सतीश पोले, अजय दलवी, ८६ किलो उमेश महापुरे, अजय दिंडे, ९२ किलो - नितीन आड़े, विष्णू बोरकर, ९७ किलो - विठ्ठल बोके, अभिमन्यू शिंदे, तर महाराष्ट्र केसरी गट ८६ ते १२५ किलोसाठी शुभम जाधव आणि मंगेश करण यांची निवड करण्यात आली.
या कुस्ती स्पर्धेत पंच म्हणून अनिल पांडे यांनी काम पाहिले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी अशोक बोरकर, नामदेव ढेकले, गजानन जाधव, गणेश खोलगडे, खेमानंद मेहता, अरुण जाधव, गणेश पवार, यश सोनटक्के, नितीन जाधव, सुमीत वानखड़े, वैभव घाटे, नाना घाटे, रोहन जाधव, अनिल चव्हाण, घनश्याम भाराटे, कृष्णा पोंगाड़े, उमेश बेद्रे, निखील लेवेकर, दुर्गेश पेंशनवार, राहुल आढाव, सुरोशे, अभिजीत गायकवाड, पवन भालेकर, योगेश तायडे, राहुल वाघमोड़े आदींनी परिश्रम घेतले.