त्रिशरण एनलाईटमेंट फाउंडेशनच्या तालुका समन्वयकपदी रविना किन्हीकर यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:25 AM2021-07-23T04:25:38+5:302021-07-23T04:25:38+5:30

फोटो फुलसावंगी : पुणे येथील त्रिशरण एनलाईटमेंट फाउंडेशन या विकासदूत प्रकल्पातर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्या अंतर्गत ‘एक ...

Selection of Ravina Kinhikar as Taluka Coordinator of Trisharan Enlightenment Foundation | त्रिशरण एनलाईटमेंट फाउंडेशनच्या तालुका समन्वयकपदी रविना किन्हीकर यांची निवड

त्रिशरण एनलाईटमेंट फाउंडेशनच्या तालुका समन्वयकपदी रविना किन्हीकर यांची निवड

Next

फोटो

फुलसावंगी : पुणे येथील त्रिशरण एनलाईटमेंट फाउंडेशन या विकासदूत प्रकल्पातर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्या अंतर्गत ‘एक आठवण आपल्या दारी’ उपक्रम राबविण्यात आला.

महागाव तालुका समन्वयक रविना किन्हीकर यांच्या नेतृत्वात हा उपक्रम राबविण्यात आला. विकासदूत प्रकल्प समाजातील उपेक्षित लाभार्थ्यांपर्यंत शासकीय व निमशासकीय योजनांचा लाभ पोहोचविते. गाव, शहर, वाड्या, वस्ती, तांड्यावर व दुर्गम भागात राहणाऱ्या लोकांपर्यंत योजना पोहोचविण्याचे कार्य करते. या प्रकल्पाच्या महागाव तालुका समन्वयक रविना किन्हीकर यांनी संस्थापक अध्यक्ष प्रज्ञा वाघमारे, मराठवाडा समन्वयक दिगांबर वाघ, जिल्हा समन्वयक सुषमा शिरभाते यांच्या मार्गदर्शनात उपक्रम राबविला.

आशा राठोड, नंदा जाधव, श्रीशा राठोड, विजय जाधव, उमेश जाधव, आशा अहिरकर, लक्ष्मी खरात, अमोल खरात, प्रसाद रावते यांची विकासदूत म्हणून निवड करण्यात आली. या विकादूतांमार्फत ‘एक आठवण आपल्या दारी’, हा उपक्रम राबविण्यात आला. यात कोरोनामुळे निधन झालेल्यांच्या घरी त्यांची एक आठवण म्हणून एक रोपटे लावण्यात आले.

Web Title: Selection of Ravina Kinhikar as Taluka Coordinator of Trisharan Enlightenment Foundation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.