महागावात बियाण्यांची जादा दराने विक्री

By Admin | Published: June 2, 2016 12:12 AM2016-06-02T00:12:52+5:302016-06-02T00:12:52+5:30

यावर्षी तालुक्यात कापूस आणि सोयाबीनचा पेरा वाढणार आहे.

Selling of seeds at high rates in Mahaga | महागावात बियाण्यांची जादा दराने विक्री

महागावात बियाण्यांची जादा दराने विक्री

googlenewsNext

तहसीलदारांना निवेदन : शिवसेनेचा कृषी विक्रेत्याविरुद्ध एल्गार
महागाव : यावर्षी तालुक्यात कापूस आणि सोयाबीनचा पेरा वाढणार आहे. शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेत कृषी केंद्र चालकांनी बिटी बियाण्यासारख्या कपाशी आणि सोयाबीन बियाण्यांची कृत्रिम टंचाई निर्माण केली आहे. आगाऊ रक्कम देणाऱ्यांना बियाण्याची विक्री केली जात आहे. या साठेबाज कृषी केंद्र चालकांवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना तालुका प्रमुख समाधान ठाकरे यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
तालुक्यात सर्वाधिक मागणी असलेल्या कपाशी बियाण्यांची कृत्रिम टंचाई निर्माण करण्यात आली. ज्या बियाण्याची सर्वाधिक मागणी आहे त्या सोबत इतर जातीचे वाण लिंकिंग केले जात आहे. शेतकऱ्यांना त्याचा नाहक भुर्दंड पडत आहे. या बाबत शेतकऱ्यांनी तक्रार केल्यास त्यांना बियाणे दिले जात नाही. यातून शेतकऱ्यांची लूट होत असून कृषी केंद्रावर भावफलक, साठा फलक लावण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर सेना तालुका प्रमुख समाधान ठाकरे, माजी शहर प्रमुख सतीश नरवाडे, विशाल पांडे, अ‍ॅड. कैलास वानखेडे, प्रवीण कदम, लक्ष्मीबाई पारवेकर, राजू देवतळे, अशोक तुमवार, ग्यानबा नवाडे, संदीप खराटे, विशाल गुप्ता, बंडू ठाकरे, एकनाथ सुरोसे, अविनाश जाधव, बाळू मस्के, दत्तराव चिंचोळकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Selling of seeds at high rates in Mahaga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.