एसटी बस स्मार्ट कार्डसाठी ज्येष्ठांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 10:17 PM2019-06-26T22:17:01+5:302019-06-26T22:17:17+5:30
राज्य परिवहन महामंडळाने ज्येष्ठ नागरिकांना चार हजार किलोमीटर प्रवासाकरिता सवलत बहाल केली आहे. ही सवलत मिळविण्यासाठी यापुढे स्मार्टकार्डचा वापर होणार आहे. हे स्मार्टकार्ड मिळविण्यासाठी जेष्ठ नागरिकांनी राज्य परिवहन महामंडळाच्या कार्यालयात गर्दी केली आहे. या ठिकाणी गर्दी वाढताच लिंक फेल होण्याचे प्रकार वाढले आहे. याचा फटका ज्येष्ठ नागरिकांना बुधवारी सहन करावा लागला.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : राज्य परिवहन महामंडळाने ज्येष्ठ नागरिकांना चार हजार किलोमीटर प्रवासाकरिता सवलत बहाल केली आहे. ही सवलत मिळविण्यासाठी यापुढे स्मार्टकार्डचा वापर होणार आहे. हे स्मार्टकार्ड मिळविण्यासाठी जेष्ठ नागरिकांनी राज्य परिवहन महामंडळाच्या कार्यालयात गर्दी केली आहे. या ठिकाणी गर्दी वाढताच लिंक फेल होण्याचे प्रकार वाढले आहे. याचा फटका ज्येष्ठ नागरिकांना बुधवारी सहन करावा लागला.
राज्य परिवहन महामंडळाने ज्येष्ठ नागरिकांसाठी स्मार्ट कार्ड योजना आणली आहे. या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना चार हजार किलो मीटरचा प्रवास करता येणार आहे. पूर्वी मतदान कार्ड, आधारकार्ड असले तरी या योजनेचा लाभ मिळत होता. आता स्मार्टकार्ड खेरीज अर्ध्या तिकीटचा प्रवास थांबणार आहे. स्मार्टकार्ड अनिवार्य झाल्याने ज्येष्ठ नागरिकांनी या ठिकाणी एकच गर्दी केली आहे.
सकाळी ७ वाजतापासून ज्येष्ठ नागरिकांच्या लाईन राज्य परिवहन महामंडळाच्या कार्यालयात पहायला मिळत आहे. बुधवारी या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांच्या लाईन लागल्या होत्या. मात्र दूपारपर्यंत कर्मचारी न पोहोचल्याने ज्येष्ठ नागरिकांनी चांगलाच संताप नोंदविला. या ठिकाणी सोईसुविधा पुरविण्याची मागणी केली आहे.
वयोवृध्दांची संख्या जास्त असताना केवळ एकच खिडकी परिवहन महामंडळाने ठेवली आहे. त्यातही नोंदणी संथगतीने केली जाते. हा प्रकार थांबावा वा वितरण प्रणालीत सुुुधारणा करावी, अशी मागणी सुंदर जाधव, पांडुरंग बोेरकर, लिलाबाई जाधव, कांताबाई शिंदे, शोभा दळवी यांनी केली आहे. महामंडळ प्रशासनाने वृद्धांचा त्रास करण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे.