पर्यावरण संरक्षणासाठी सरसावली बालके

By admin | Published: September 15, 2016 01:26 AM2016-09-15T01:26:00+5:302016-09-15T01:26:00+5:30

येथील शिवाजी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची निर्मिती करून पर्यावरण रक्षणाचा संकल्प केला.

Sesame babies for environmental protection | पर्यावरण संरक्षणासाठी सरसावली बालके

पर्यावरण संरक्षणासाठी सरसावली बालके

Next

शिवाजी विद्यालय : विद्यार्थ्यांनी तयार केल्या मातीच्या गणेशमूर्ती
सवना : येथील शिवाजी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची निर्मिती करून पर्यावरण रक्षणाचा संकल्प केला. शाळेत मातीच्या मूर्ती तयार करण्याची कार्यशाळा आणि पर्यावरणपूरक गणेशमूर्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
राष्ट्रीय हरित सेनेच्या उपक्रमांतर्गत या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. शाडू मातीपासून गणेशमूर्ती तयार करण्याचे प्रशिक्षण कलाशिक्षक राजेश आंबेकर यांनी दिले. जवळपास १५० विद्यार्थ्यांनी शाडूच्या मातीच्या मूर्त्या स्वत: तयार करून त्यांची स्थापना आपल्या घरी केली. यावेळी घेण्यात आलेल्या स्पर्धेत पाचवी ते सातवीच्या गटात प्रथम क्रमांक संस्कृती संजय मोरे, द्वितीय अंजली पांडुरंग जाधव, तृतीय स्वप्नाली शिवाजी हनवते आणि प्रोत्साहनपर ओंकार गजानन गायकवाड, आशीष गजानन रेंगे यांनी पटकाविले. आठवी ते दहावीच्या गटात प्रथम वैष्णवी गुलाब देशमुख, द्वितीय सूरज सदाशिव भाग्यवंत, तृतीय सानिका सदानंद इंगळे आणि प्रोत्साहनपर तुळशीदास तुकाराम सुरोशे, भाग्यश्री अवधूतराव जांभूळकर यांनी पटकाविले. या उपक्रमाला मुख्याध्यापक ए.एम. देशमुख, उपमुख्याध्यापक एन.बी. राठोड, एन.ए. देशमुख, एम.पी. देशमुख, बी.टी. टारफे, व्ही.आर. धनवे यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)

Web Title: Sesame babies for environmental protection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.