सुटीच्या दिवशीही संचमान्यता व समायोजन
By admin | Published: August 29, 2016 12:51 AM2016-08-29T00:51:16+5:302016-08-29T00:51:16+5:30
जिल्हा माध्यमिक शिक्षण विभाग कार्यालयात रविवारची सुटी असतानाही कामकाज करण्यात आले. संचमान्यता व समायोजनासाठी
शिक्षणाधिकारी कार्यालय : १२ आक्षेपांची घेतली सुनावणी
यवतमाळ : जिल्हा माध्यमिक शिक्षण विभाग कार्यालयात रविवारची सुटी असतानाही कामकाज करण्यात आले. संचमान्यता व समायोजनासाठी राज्याच्या शिक्षण संचालनालयाने दिलेल्या निर्देशानुसार शनिवारी व रविवारी या कामकाज सुरू होते.
माध्यमिक शिक्षण विभागाने खासगी अनुदानित शाळांमध्ये अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांची माहिती संकेतस्थळावर भरली आहे. अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांची, संबंधित शाळेचे मुख्याध्यापक, संस्था प्रतिनिधींची सुनावणी घेण्यात आली. त्यात शाळा व संस्थास्तरावर अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांची निश्चिती करण्यात आली. २४ आॅगस्टला हा डाटा अंतिम करण्यात आला. त्यात अतिरिक्त शिक्षक व रिक्तपदांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. या यादीवर विभागाने आक्षेप मागविले होते.
आक्षेप सादर करण्यासाठी शनिवारी कार्यालय सुरू ठेवण्यात आले होते. या यादीवर जवळपास १२ आक्षेप सादर करण्यात आले. त्यात संवर्ग बदल आणि शैक्षणिक अर्हतेत बदल करण्यासंबंधीचे मुद्दे होते. या आक्षेपांवर रविवारी सुटीच्या दिवशी सुनावणी घेण्यात आली. त्यासाठी सुटी असूनही कामकाज करण्यात आले. यानंतर अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांची व रिक्त जागांची अंतिम यादी तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ही यादी निश्चित होताच संकेतस्थळावर प्रमाणपत्र-२ अपलोड करण्यात येणार आहे.
ही सर्व प्रक्रिया पूर्ण होताच ३० व ३१ आॅगस्टला अतिरिक्त ठरलेल्या सर्व शिक्षकांचे आॅनलाईन पद्धतीने समायोजन केले जाणार आहे. त्यासाठी संबंधित अतिरिक्त शिक्षकांना या दोन्ही दिवशी त्यांच्या मूळ नियुक्ती आदेशाची प्रत, शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेच्या कागदपत्रांसह माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात हजर राहावे लागणार आहे. या दोन दिवसात अतिरिक्त ठरलेल्या सर्व शिक्षकांचे समायोजन केले जाईल. ही सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी चौथा शनिवार व रविवारीही कामकाज करण्यात आले. या (शहर प्रतिनिधी)