जिल्ह्यात सात ‘ब्लॅक स्पॉट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 09:44 PM2018-01-14T21:44:34+5:302018-01-14T21:45:06+5:30

जिल्ह्यातील अपघातप्रवण स्थळांच्या सर्वेक्षणानंतर जिल्ह्यात सात ‘ब्लॅक स्पॉट’ आढळून आले असून त्यासंदर्भातील अहवाल केंद्रीय सडक परिवहन व राजमार्ग महामंत्रालयाकडे पाठविण्यात आला आहे.

Seven 'black spots' in the district | जिल्ह्यात सात ‘ब्लॅक स्पॉट’

जिल्ह्यात सात ‘ब्लॅक स्पॉट’

Next
ठळक मुद्देअपघात प्रवणस्थळांचा शोध : केंद्रीय सडक परिवहन मंत्रालयाकडे अहवाल

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यातील अपघातप्रवण स्थळांच्या सर्वेक्षणानंतर जिल्ह्यात सात ‘ब्लॅक स्पॉट’ आढळून आले असून त्यासंदर्भातील अहवाल केंद्रीय सडक परिवहन व राजमार्ग महामंत्रालयाकडे पाठविण्यात आला आहे. परिवहन विभाग आणि बांधकाम विभागाने केलेल्या संयुक्त सर्वेक्षणात सातही ‘ब्लॅक स्पॉट’ वणी आणि राळेगाव तालुक्यात आढळून आले. आता या मार्गावरील अपघातांची तीव्रता कमी करण्यासाठी उपाययोजना वरिष्ठ पातळीवर केल्या जाणार आहे.
केंद्रीय सडक परिवहन व राजमार्ग मंत्रालयाने महामार्गावरील अपघातस्थळांचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश परिवहन विभाग (आरटीओ) आणि बांधकाम विभागाला दिले होते. सर्वेक्षण करून त्या ठिकाणी कुठल्या दुरूस्त्या केल्या म्हणजे अपघाताची तीव्रता कमी करता येईल, याबाबतचा अहवाल सार्वजनिक बांधकाम विभागाला मागितला. ब्लॅक स्पॉट निवडताना किमान तीन वर्षातील अपघाती मृत्यूची नोंद घेण्याचे सूचविले होते. अपघाती मृत्यूंचा सरासरी विचार करून त्या स्थळांना ब्लॅक स्पॉट घोषित करायचे की नाही, हे ठरविण्यात आले. या निकषानुसारच पोलीस ठाण्यात अपघातांच्या स्थळाबाबत असलेल्या नोंदी आणि त्या ठिकाणी झालेली जीवितहानी, याचा अभ्यास करून अशी स्थळे निवडण्यात आली आहे.
या सर्वेक्षणात जिल्ह्यात करंजी-वणी-घुग्गुस मार्गावर तीन ब्लॅक स्पॉट आढळून आले. याशिवाय वणी तालुक्यातील शिरपूर येथे दोन, वडकी आणि वणी-वरोरा मार्गावर प्रत्येकी ब्लॅक स्पॉट असल्याचा अहवाल आरटीओ व सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केला. वणी परिसर वगळता जिल्ह्यात कुठेही ब्लॅक स्पॉटच्या निकषात बसेल, इतकी संख्या अपघातस्थळांवर नाही. या सात ब्लॅक स्पॉटवर अपघाताची संख्या कमी करण्यासाठी काही दुरुस्त्या सुचविण्यात आल्या आहे. हा अहवाल उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने परिवहन आयुक्तांकडे पाठविला. तो केंद्रीय सडक परिवहन मंत्रालयाकडे पाठविला जाणार आहे.
गुगल मॅपवर इंडिकेशन
प्रवास करताना बहुतांश चालकांकडून मोबाईलवर गुगल मॅपचा वापर केला जातो. अनेक वाहनांमध्ये जीपीआरएस सिस्टीम असल्याने हा मॅप वापरला जातो. आता ब्लॅक स्पॉट रस्त्यावर असल्याची सूचना चालकांना ५०० मीटरपूर्वीच मिळणार आहे. त्यामुळे वाहनाचा वेग नियंत्रित करून होणारा अपघात त्यांना टाळता येणार आहे. यासाठी ब्लॅक स्पॉट गुगल मॅपला टॅग केले जाणार आहे.

Web Title: Seven 'black spots' in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.