वणी येथे सात लाखांची रोख जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2019 15:59 IST2019-03-22T15:59:09+5:302019-03-22T15:59:25+5:30
मारेगाव पोलीस व महसूल विभागाच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली.

वणी येथे सात लाखांची रोख जप्त
यवतमाळ : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ठिकठिकाणी वाहनांची तपासणी केली जात आहे. त्यात चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात बुधवारी रात्री दोन वाहनांमधून सहा लाख ९१ हजारांची रोकड जप्त करण्यात आली. मारेगाव पोलीस व महसूल विभागाच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली.
चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा येथील आमडीचा युवक आपल्या कारने मारेगाववरून कोसाराकडे जात असताना वाहन तपासणी केली असता पाच लाख ३१ हजार ८७० रुपये आढळून आले. त्याबाबत समाधानकारक पुरावे न दिल्याने ही रक्कम जप्त करण्यात आली. वणी-वरोरा मार्गावरसुद्धा दुचाकीवरील युवकाकडून एक लाख ६० हजारांची रोकड जप्त करण्यात आली. हा युवक मारेगाव तालुक्याच्या धामणीचा रहिवासी आहे.