सात महिन्यात पेट्रोल, डिझेल पाच रुपयांनी भडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 10:02 PM2019-07-24T22:02:14+5:302019-07-24T22:02:48+5:30

वाहनांची संख्या दिवसेन्दिवस वाढत आहे. यासोबतच पेट्रोल डिझेलच्या किमती वाढत आहे. गत सात महिन्यांत पेट्रोलच्या दरामध्ये लिटरमागे पाच रूपयांची वाढ झाली आहे. पेट्रोलचे दर ८० रूपये १२ पैसे लिटर तर डिझेलचे दर ६९ रूपये ४० पैशांवर पोहचले आहेत.

In seven months, petrol and diesel were hiked by five rupees | सात महिन्यात पेट्रोल, डिझेल पाच रुपयांनी भडकले

सात महिन्यात पेट्रोल, डिझेल पाच रुपयांनी भडकले

Next
ठळक मुद्देसर्वसामान्यांना भुर्दंड : तरीही विरोधी पक्ष अवाक्षरही काढायला नाही तयार

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : वाहनांची संख्या दिवसेन्दिवस वाढत आहे. यासोबतच पेट्रोल डिझेलच्या किमती वाढत आहे. गत सात महिन्यांत पेट्रोलच्या दरामध्ये लिटरमागे पाच रूपयांची वाढ झाली आहे. पेट्रोलचे दर ८० रूपये १२ पैसे लिटर तर डिझेलचे दर ६९ रूपये ४० पैशांवर पोहचले आहेत. यानंतरही दरवाढी विरोधात विरोधक अवाक्षरही उच्चारण्यास तयार नाही. यामुळे सर्वसामान्यांचा खिसा रिता होत आहे. गंभीर म्हणजे, पेट्रोल आणि डिझेलचे दर आणखी वाढण्याची शक्यता या उद्योगातील अभ्यासक व्यक्त करीत आहे.
प्रत्येक काम जलदगतीने व्हावे म्हणून आज वाहनांचा वापर बेसुमार वाढला आहे. यामध्ये दुचाकी वाहनांची संख्या सर्वाधिक आहे. यासोबतच दळणवळणाची साधने म्हणून चारचाकी वाहनांची संख्या आणि मालवाहू वाहनांची संख्या मोठी आहे. त्यामुळे दररोज दीड लाख लिटर पेट्रोलची विक्री यवतमाळ जिल्ह्यात होते. यावरून वाहनांसाठी पेट्रोल-डिझेल किती महत्त्वाचे आहे, हे लक्षात येते. या इंधनाच्या किमतीत दरवाढ झाल्याने भाडेवाढ आणि प्रवासदर वाढीला पुढील काळात सामोरे जावे लागण्याचा धोका आहे. यातून सर्वसामान्यांचा खिसा रिता होणार आहे.
पूर्वी पेट्रोल, डिझेलच्या किमतीमध्ये थोडी जरी वाढ झाली तरी मोठे आंदोलन होत होते. आता दररोज पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढत आहे. यानंतरही विरोधक अवाक्षरही काढायला तयार नाही. जानेवारी २०१९ मध्ये पेट्रोलचे दर ७५ रूपये ४७ पैसे होते. जुलैमध्ये हे दर लिटरमागे ८० रूपये १२ पैशांवर पोहचले आहे. लिटरमागे ४ रूपये ६५ पैशांची वाढ नोंदविली गेली आहे. अशीच अवस्था डिझेलची आहे. जानेवारीमध्ये डिझेलचे दर ६५.७१ पैसे होते. हे दर आता ६९.४० पैसे झाले आहेत. यामध्ये लिटरमागे ३.६९ पैशांची वाढ नोंदविण्यात आली आहे.

Web Title: In seven months, petrol and diesel were hiked by five rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.