भरधाव वाहन उलटून सात प्रवासी जखमी
By Admin | Published: May 28, 2017 12:45 AM2017-05-28T00:45:33+5:302017-05-28T00:45:33+5:30
पांढरकवडा मार्गावरील जामडोहनजीक चारचाकी वाहन अनियंत्रित झाले. या भरधाव वाहनाने अनेक कोलांटउड्या खाल्ल्या.
जामडोहची घटना : दोघे गंभीर, नागपूरला हलविले, जखमी राजुऱ्याचे
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : पांढरकवडा मार्गावरील जामडोहनजीक चारचाकी वाहन अनियंत्रित झाले. या भरधाव वाहनाने अनेक कोलांटउड्या खाल्ल्या. यामध्ये सात जण गंभीर जखमी झाले. दोघांची स्थिती गंभीर असून त्यांना नागपुरात हलविण्यात आले.
शनिवारी सकाळी ११.३० च्या सुमारास तवेरा वाहन (एमएच १२ जेझेड ०४५६) खानगाव-जामडोह रस्त्याजवळ क्षतिग्रस्त झाले. या वाहनाने चार ते पाच पलट्या घेतल्या. घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे विभाग प्रमुख संतोष गदई यांच्यासह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. वाहनात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढून सात जखमींना तत्काळ येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले.
चंद्रपूर जिल्ह्यातील राजुराचे रहिवासी असलेले अभिजित अनिल दासरी (१९), शेखर राजेश भुरा (३६), भरू एम. बड्डा (६०), शंकर व्ही. शेरपूरला (२५), अभिषेक दासरी (२८) यांचा जखमीत समावेश आहे. संतोष शेदूरवार, प्रणीत एम. कांबळे या दोघांना नागपूरला हलविण्यात आले.