स्वस्त धान्य दुकानात साडेसात हजार पॉस मशीन्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 03:02 PM2017-10-26T15:02:13+5:302017-10-26T15:04:47+5:30

गरजू लाभार्थ्यांना धान्य मिळावे आणि रेशन अन्नधान्य वितरण योग्य पद्धतीने होण्यासाठी रेशनिंग व्यवस्थेचे संपूर्ण संगणकीकरण करण्यात येत आहे.

Seven thousand Pous Machines in the cheap grain shops | स्वस्त धान्य दुकानात साडेसात हजार पॉस मशीन्स

स्वस्त धान्य दुकानात साडेसात हजार पॉस मशीन्स

Next
ठळक मुद्देयोग्य लाभार्थीस अन्नधान्य मिळण्यास मदतयवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक मशीन्सचा वापरअमरावती विभागातील सर्वच दुकानात मशीन्स

ऑनलाईन लोकमत
यवतमाळ : गरजू लाभार्थ्यांना धान्य मिळावे आणि रेशन अन्नधान्य वितरण योग्य पद्धतीने होण्यासाठी रेशनिंग व्यवस्थेचे संपूर्ण संगणकीकरण करण्यात येत आहे. यासाठी अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानामध्ये आॅनलाईन पद्धतीने धान्य वितरित करण्यासाठी सात हजार ३४३ पॉस (पीओएस - पॉर्इंट आॅफ सेल) मशिन्स बसविण्यात आली आहे. धान्य खरेदी करणाºया ग्राहकांचे बायोमेट्रिक खात्री करूनच त्याला धान्य वितरित करण्यात येणार आहे. यामुळे धान्य वितरणातील गैरप्रकारांना आळा बसणार आहे.

अमरावती विभागात सर्वाधिक पॉस मशिन्स यवतमाळ जिल्ह्यात बसविण्यात आल्या आहेत. यवतमाळ तालुक्यात २ हजार ६९ मशीन्स बसविण्यात आल्या आहेत. पुसद तालुक्यात सर्वाधिक २०० तर यवतमाळमध्ये १९३ मशीन्स बसविण्यात आले आहेत. झरीजामणी या आदिवासी बहुल तालुक्यात १०२ मशीन्स बसविण्यात आल्या आहेत. अमरावती जिल्ह्यात १ हजार ९१२ मशीन बसविण्यात आल्या आहेत. सर्वाधिक १६५ मशीन्स अचलपूर तालुक्यात बसविण्यात आल्या आहे. जिल्ह्यातील धारणी आणि चिखलदरा या दुर्गम भागातही मशीन्स बसविण्यात आल्या आहे. यात धारणी तालुक्यात १६१ तर चिखलदरा तालुक्यात १५२ मशीन्स कार्यरत आहेत.

बुलडाणा जिल्ह्यात १ हजार ५२४ मशिन्स बसविण्यात आल्या आहे. मेहकर तालुक्यात सर्वाधिक १७४ तर त्यापाठोपाठ चिखली तालुक्यात १७१ मशिन्स बसविण्यात आल्या आहे. अकोला जिल्ह्यात एक हजार ६० मशिन्स बसविण्यात आल्या आहेत. यात ३०१ मशिन्स अकोला तालुक्यात आहे. अकोटमध्ये १६४ तर मुर्तीजापूर तालुक्यात १६३ मशिन्स बसविण्यात आल्या आहे. वाशिम जिल्ह्यात ७७८ मशिन्स असून कारंजा तालुक्यात १४७ तर वाशिम तालुक्यात १४५ मशिन्स आहेत.

अशी होते यंत्रणा कार्यान्वित

लाभार्थी धान्य घेण्यासाठी रास्त भाव दुकानात आल्यानंतर त्याला अंगठा मशीनवर ठेऊन खात्री करावी लागेल. त्यानंतर लाभार्थीचा त्वरित संपूर्ण डाटा दिसून येईल. त्याला द्यायचे धान्य, त्याची रक्कम याबाबतच्या संपूर्ण तपशिलाची पावतीच मशीनमधून बाहेर पडेल. त्या पावतीच्या आधारे रास्त भाव धान्य दुकानदार धान्य देईल. अश पद्धतीने ई-पीडीएस व्यवहार होत असल्याने वितरण व्यवस्थेत पारदर्शकता वाढण्यास मदत मिळत आहे.



‘अनुदानातून बाहेर पडा’ योजना

शिधापत्रिकेवरील धान्य काही लाभार्थी घेत नाहीत. तेच धान्य गरजू लोकांना मिळावे, यासाठी ‘गिव्ह इट अप’ ही योजना सुरू केली आहे त्याला ‘अनुदानातून बाहेर पडा’ असे नाव देण्यात आले आहे. ज्यांना रेशनचे धान्य नको आहे त्यांना आपले धान्य स्वेच्छेने नाकारण्याचा पर्याय या योजनेत दिला आहे. त्यातून बचत होणारे धान्य गरजूंना देण्यात येणार आहे.

Web Title: Seven thousand Pous Machines in the cheap grain shops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.