सातवे आंबेडकरी युवा साहित्य संमेलन रविवारी
By admin | Published: February 22, 2017 01:19 AM2017-02-22T01:19:18+5:302017-02-22T01:19:18+5:30
आंबेडकरी साहित्य व कला अकादमी तथा नॅशनल आंबेडकराईट गार्डच्या संयुक्त विद्यमाने सातवे आंबेडकरी युवा साहित्य संमेलन
लोकनाथ यशवंत उद्घाटक : परिसंवाद, परिचर्चा व आंबेडकरी लोकन्यायालय
यवतमाळ : आंबेडकरी साहित्य व कला अकादमी तथा नॅशनल आंबेडकराईट गार्डच्या संयुक्त विद्यमाने सातवे आंबेडकरी युवा साहित्य संमेलन रविवारी २६ फेब्रुवारी रोजी यवतमाळात होऊ घातले आहे. संदीप मंगल्ममध्ये या संमेलनाचे सकाळी १० वाजता प्रसिद्ध कवी लोकनाथ यशवंत यांच्या हस्ते होणार आहे. मंगळवारी आयोजनाबाबत पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली.
संमेलन परिसरातला रोहित वेमुला, सभागृहास नामदेव ढसाळ, तर विचारमंचाला अरुण काळे नाव देण्यात आले असून छत्रपती संभाजी राजे, मुक्ता साळवे, बिरसा मुंडा व फातिमा शेख आदी प्रवेशद्वार राहणार आहेत. संमेलनाध्यक्ष डॉ. मंगेश बनसोड, विशेष अतिथी सिनेकलावंत मिलिंद शिंदे, संपादक राही भिडे, प्रा. डॉ. महेंद्र भवरे, प्रा. सतेश्वर मोरे, प्रा. माधव सरकुंडे राहणार आहेत. स्वागताध्यक्ष नंदकुमार रामटेके, अधीक्षक अभियंता शशिकांत सोनटक्के, जिल्हा उपनिबंधक गौतम वर्धन, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे सहायक संचालक विनय ठमके, मुख्याधिकारी सुदाम धुपे, अन्न व औषधी प्रशासनाचे सहायक आयुक्त जयंत वाणे, सहायक करमणूक करअधिकारी अजय गौरकार, जिल्हा ग्रंथपाल नितीन सोनोने आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
आंबेडकरी साहित्यनिर्मिती प्रक्रियेतील महिलांची सहभागिता : आव्हाने व उपाय या विषयावर राही भिडे यांच्या अध्यक्षतेत परिसंवाद होणार आहे. ‘आंबेडकरी चळवळ आणि आम्ही’ या विषयावर आंबेडकरी लोकन्यायालय हा अभिनव उपक्रमही राबविला जाणार आहे. अॅड. गोविंद बनसोड न्यायाधीश म्हणून काम पाहतील. तर सुनिल वासनिक व संजय ढोले अधिवक्ता असतील. प्रा. डॉ. अशोक कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली विविध विषयांवर परिचर्चा होणार आहे. शिवाय, ‘आंबेडकरी ड्रामेबाज ग्रुप’ तसेच ‘युवा द रिफॉर्मिस्ट युथ असोसिएशन’ दोन नाटकांचे सादरीकरण करणार आहे. डॉ. मंगेश बनसोड यांच्या अध्यक्षतेखाली रात्री ८ वाजता समारोप होईल. समारोपीय कवीसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी संदेश ढोले असतील, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
पत्रकार परिषदेला अकादमीचे आनंद गायकवाड, कवडूजी नगराळे, गोपीचंद कांबळे, डॉ. साहेबराव कदम, सुमेध ठमके, मंगला जाधव, वैशाली ढगे, दत्ता हाडके, रवी बरडे, डॉ. सुभाष जमधाडे आदी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)