आश्रमशाळा शिक्षकांना दिवाळीपूर्वी सातवा वेतन आयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2019 11:48 AM2019-09-02T11:48:02+5:302019-09-02T11:49:51+5:30

आदिवासी विकास आयुक्त किरण कुळकर्णी यांनी आश्रमशाळा कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात अपर आयुक्तांना निर्देश दिले आहे.

Seventh pay commission for Ashram school teachers before Diwali | आश्रमशाळा शिक्षकांना दिवाळीपूर्वी सातवा वेतन आयोग

आश्रमशाळा शिक्षकांना दिवाळीपूर्वी सातवा वेतन आयोग

googlenewsNext
ठळक मुद्देआश्रमशाळेची वेळही होणार पूर्ववतआयुक्तांचे निर्देश

अविनाश साबापुरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : राज्यातील अनुदानित आश्रमशाळांमधील शिक्षक कर्मचाऱ्यांना अद्यापही सातवा वेतन लागू झालेला नाही. मात्र आदिवासी विकास आयुक्त किरण कुळकर्णी यांनी आश्रमशाळा कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात अपर आयुक्तांना निर्देश दिले आहे. वेतन निश्चितीचे कॅम्प घेण्याबाबत प्रकल्प अधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वी शिक्षकांना वाढीव वेतन मिळण्याची शक्यता आहे.
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना १ जानेवारीपासूनच सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला. विशेष म्हणजे शासकीय आश्रमशाळांमधील शिक्षकांनाही त्याचा लाभ मिळाला. मात्र अनुदानित आश्रमशाळांमधील शिक्षक अद्यापही वंचित आहे. याबाबत विविध संघटनांनी पाठपुरावा केल्यानंतर नाशिक येथील आदिवासी विकास आयुक्तालयाने २१ आॅगस्ट रोजीच राज्यातील सर्व अपर आयुक्तांना निर्देश दिले. अनुदानित आश्रमशाळेतील कर्मचाºयांना वेतन आयोग लागू करण्यासाठी वेतन निश्चितीचे कॅम्प आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. आगामी दहा दिवसात वेतन निश्चितीचे आदेश अंतिम करण्याची जबाबदारी संबंधित मुख्याध्यापक आणि प्रकल्प अधिकाºयांना देण्यात आली आहे. त्यामुळे दिवाळीच्या महिन्याचे वेतन वाढीव मिळण्याची दाट शक्यता आहे.
दरम्यान मागील शैक्षणिक सत्रात अचानक आश्रमशाळांची वेळ बदलण्यात आल्याने शिक्षकांमध्ये प्रचंड संताप पसरलेला आहे. सकाळी ९ वाजतापासून सायंकाळी उशिरापर्यंत आश्रमशाळेची वेळ वाढविण्यात आली होती. मात्र आता आश्रमशाळेची वेळ पूर्वीप्रमाणेच सकाळी ११ ते सायंकाळी ५ करण्याबाबत देखील आदिवासी विकास आयुक्त कुळकर्णी यांनी निर्देश दिले आहे. मात्र नवीन आश्रमशाळा संहितेतील तरतुदीनुसार विषयवार तासिकेचे नियोजन या शाळांना लागू राहणार आहे. एका आठवड्यातील अध्यायनाचा कालावधी म्हणून ४५ तासिका बंधनकारक करण्यात आल्या आहेत.

पांढरकवडा, पुसदला आदेशाची प्रतीक्षा
आदिवासी विकास आयुक्तांच्या निर्देशानुसार राज्यातील इतर अपर आयुक्तांनी आपआपल्या अखत्यारीतील आश्रमशाळांच्या वेळा पूर्ववत केल्या आहेत. मात्र काही प्रकल्प अधिकाºयांना अद्यापही अपर आयुक्त स्तरावरून लेखी आदेश मिळालेले नाही. यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा आणि पुसद प्रकल्प कार्यालयांतर्गत येणाºया आश्रमशाळा अद्यापही पूर्ववत वेळानुसार सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे इतर जिल्ह्यातील आश्रमशाळेचा हवाला देत शिक्षक संघटनांनी प्रकल्प कार्यालयाकडे पाठपुरावा सुरू केला आहे.

आयुक्तांनी आदेश काढले आहेत. मात्र अमरावती अपर आयुक्त स्तरावरून अद्याप आम्हाला सूचना मिळालेल्या नाही. मी अपर आयुक्त कार्यालयाशी संपर्क साधला. येत्या दोन दिवसात आम्हाला आदेश मिळण्याची शक्यता आहे. आठवडाभरातच आपल्याही आश्रमशाळांची वेळ पूर्ववत केली जाईल.
- आत्माराम धाबे
प्रकल्प अधिकारी, पांढरकवडा.

Web Title: Seventh pay commission for Ashram school teachers before Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा