‘गाळमुक्त तलाव, गाळयुक्त शिवार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 09:44 PM2018-03-11T21:44:12+5:302018-03-11T21:44:12+5:30

भविष्यातील भीषण पाणीटंचाईवर यशस्वी मात करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘गाळ मुक्त तलाव, गाळ युक्त शिवार’ ही योजना अमलात आणली.

'Sewingless Ponds, Sludge Shiver' | ‘गाळमुक्त तलाव, गाळयुक्त शिवार’

‘गाळमुक्त तलाव, गाळयुक्त शिवार’

Next
ठळक मुद्देकळंब येथे मार्गदर्शन : कार्यशाळेत विविध विभागाच्या कर्मचाऱ्यांना दिल्या टिप्स

ऑनलाईन लोकमत
कळंब : भविष्यातील भीषण पाणीटंचाईवर यशस्वी मात करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘गाळ मुक्त तलाव, गाळ युक्त शिवार’ ही योजना अमलात आणली. या माध्यमातून तलावाच्या पाणी साठवण क्षमतेत वाढ, तर शेतीची पोत सुधारण्यास मदत होईल. ही योजना यशस्वी करण्यासाठी प्रशासनाला सर्वांनी सहकार्य करावे, अशी विनंती आमदार डॉ.अशोक उईके यांनी केली.
येथील तहसील कार्यालयातील सभागृहात ‘गाळ मुक्त तलाव, गाळ युक्त शिवार’ या विषयावरील कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेच्या शिक्षण व आरोग्य सभापती नंदिनी दरणे, राळेगावचे उपनगराध्यक्ष प्रफुल्लसिंग चव्हाण, कळंबचे तहसीलदार रणजित भोसले, राळेगावचे तहसीलदार हेमंत गांगुर्डे, बाभूळगावचे तहसीलदार दिलीप झाडे, खरेदी विक्री संघाचे सभापती बालु पाटील दरणे, सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता ढोबळे, भाजपाचे तालुकाध्यक्ष कैलास बोंद्रे, सुरेश केवटे, रुपेश राऊत उपस्थित होते.
शेतकºयांनी तलावातील सुपिक गाळ आपल्या शेतीत नेण्यासाठी पुढाकार घेतला पाहीजे. या माध्यमातून तलावाची पाणी साठवण क्षमता तर वाढेलच पण शेतीची पोतही सुधारण्यास मदत मिळेल. एवढेच नाही, तर भविष्यातील पाणी टंचाईपासूनही परिसराला मुक्त करता येईल. शासनाकडून यासाठी डिझेलचा खर्च दिल्या जाणार आहे. पावसाळ्यापुर्वी जास्तीत-जास्त गाळ उपसण्याचा उद्देश ठेवण्यात आल्याची माहीती आमदार डॉ.उईके यांनी दिली. कार्यशाळेला कळंब, राळेगाव व बाभूळगाव तालुक्यातील कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी, तलाठी, कृषी सहायक, ग्रामसेवक आदी उपस्थित होते.

Web Title: 'Sewingless Ponds, Sludge Shiver'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.