महागाव तालुक्यात वीज वितरणचा सावळा गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:42 AM2021-05-13T04:42:25+5:302021-05-13T04:42:25+5:30
वीज तारा कमकुवत झाल्याने अति वेगाने वारे वाहिल्यास वीज गायब होण्याच्या घटना वाढत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील सामान्य नागरिक ...
वीज तारा कमकुवत झाल्याने अति वेगाने वारे वाहिल्यास वीज गायब होण्याच्या घटना वाढत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील सामान्य नागरिक बेहाल होत आहेत. वीज निर्मितीच्या काळापासून विद्युत प्रवाह वाहून नेणाऱ्या वीज तारा खूप जुन्या व कमकुवत झाल्या आहे. परिणामी वीज सातत्याने ट्रीप होते. ग्रामीण भागात तास न तास वीज गायब होण्याचा घटना घडत आहेत.
महागाव ते गुंज या मार्गावरून शेतशिवारातून विजेचे खांब उभारून वीज वाहिनी सुरू करण्यात आली. झाडांच्या फांदीचा वाहिनीला स्पर्श झाल्यास वीज लगेच ट्रीप होते. जुने लाईनमन कार्यरत असताना त्यांना वाहिनी संदर्भात माहिती होती. नवीन कर्मचारी त्याबाबत अनभिज्ञ आहे. त्यांना नेमका फॉल्ट कुठे आहे, हे सापडतच नाही. त्यामुळे कंपनीने गांभीर्य लक्षात घेऊन पावसाळ्यापूर्वी देखभाल दुरुस्तीची कामे करावी, अशी जनभावना आहे.
बॉक्स
तालुक्यात तारा झाल्या कालबाह्य
कालबाह्य झालेल्या वीज तारा बदलण्याची गरज आहे. महावितरण याकडे लक्ष देण्यास तयार नाही. दुसरीकडे बिलात वाढ होत असल्याने सामान्य ग्राहकांना नाहक त्रास होत आहे. अतिदुर्गम भागात वितरण कंपनीने लक्ष घातल्यास जनतेला दिलासा मिळू शकतो.