शांता आई पुण्यतिथी महोत्सवाची आज सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:43 AM2021-09-11T04:43:18+5:302021-09-11T04:43:18+5:30
तळणी : येथे ब्रह्मलीन संत शांता आई पुण्यतिथी महोत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने साजरा केला जात आहे. शनिवारी या महोत्सवाची ...
तळणी : येथे ब्रह्मलीन संत शांता आई पुण्यतिथी महोत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने साजरा केला जात आहे. शनिवारी या महोत्सवाची सांगता होत आहे.
७ ते ११ सप्टेंबर दरम्यान हा महोत्सव आयोजित करण्यात आला. पहिल्या दिवशी घटस्थापना झाली. आता शनिवारी श्रद्धांजलीचा मुख्य कार्यक्रम होणार आहे. यावेळी सामूहिक ध्यान, नामधून, ग्रामसफाई, पालखी मिरवणूक व आईला श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे. बाबासाहेब मडघे, नारायणदास वैष्णव, भक्त व गावकऱ्यांच्या उपस्थितीत हभप जेवडे गुरुजी यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे.
या महोत्सवात सहभागी होणाऱ्या भक्तांनी कोविडचे नियम पाळणे आवश्यक आहे. मास्क, सॅनिटायजरचा वापर, सामाजिक अंतर आणि शासनाने दिलेल्या दिशानिर्देशांचे पालन करावे, असे आवाहन ब्रह्मलीन संत शांता आई समितीचे अध्यक्ष शाहीद रयानी व आयोजकांनी केले आहे.